Tuesday, February 19, 2019

गुरुजनाच्या संस्कारातुन विद्यार्थीच्या स्वप्नांना आकार द्या -प्रा कमलेश खिल्लार        


ड्रीम स्कुल च्या वतीने स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
 देऊळगावमही - प्रतिनिधी
      शिक्षण हे ज्ञान मिळविण्यासाठी असावं नौकरी साठी नाही परंन्तु आमच्या डॉक्टर इंजिनिअर अधिकारी होण्यच्या स्पर्धेत आम्ही ते पार विसरून गेलो आहोत.समाजात आहे ते पुस्तकात दिसलं पाहिजे तेव्हाच माणूस पणाची लढाई लढणारी पिढी निर्माण होईल. शिक्षणाबरोबरच मुलांच्या आवडीनुसार  त्याला बळकटी देण्याचा शाळेचा प्रयत्न असला पाहिजे. "ह्यूजस " नावाचा विचारवंत म्हणतो 'स्वप्नानां तु घट्ट धरून ठेव पोरा स्वप्न जर नष्ट झाली तर तुझी अवस्था होईल पंख तुटलेल्या पाखरासारखी .'तेव्हा या पाखराच्यां पंखाना मजबूत करत या गुरुजनांच्या संस्कारातुन विद्यार्थीच्या स्वप्नांना आकार द्या त्यांचे विचार शालेय जीवनातील विद्यार्थीसाठी आदर्शवत आहे असे विचार कबीर फाऊंडेशन चे अध्यक्ष  प्रा कमलेश खिल्लारे यांनी रविवार रोजी  गुरुकुलमच्या माय ड्रीमस्कुल या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
      या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा कमलेश खिल्लारे , तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती कल्याणी शिंगणे , डॉ ,महेश दंदाले ,सिने अभिनेते महेंद्र खील्लारे , गुलाबराब शिंगणे ,याची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीती होती या बाल वयातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ड्रीम स्कुल च्या माध्यमातुन स्नेहसंमेलन आयोजन करण्यात आले होते या वेळी ड्रीम स्कुल च्या सामाजिक ,शैक्षणीक तसेच पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरचा या वेळी सत्कार करण्यात आला होता या वेळी महेश दंदाले यांनी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी सुप्त गुणांना वाव देऊन उज्वल भविष्य घडवावे असे आव्हाहन या वेळी केले तसेच गुलाबराव शिंगणे यांनी ड्रीम स्कुल च्या माध्यमातुन गुरुजनांनी    सुस्वंस्कारीत पिढी घडविण्यासाठी महापुरुषाचा आदर्श , विचार , स्वंस्कार  शालेय जीवनात विद्यार्थ्यांना देऊन आदर्श पिढी घडवावी असे मत या वेळी व्यक्त केले व रणजीत खिल्लारे यांनी आपले मत या वेळी व्यक्त केले या सुभाष शिंगणे ,रामकीसन म्हके , वरद जोशी ,संतोष शिंगणे ,भगवान शिंगणे , संतोष जाधव , प्रकाश साकला , रणजित खिल्लारे, भगवान इंगळे , रवी जाधव , शेख अत्तर ,यांची प्रमुख उपस्थिती  होती या वेळी सूत्रसंचालन सौ.प्रज्ञा गजानन पाबळे ,  आभार सुप्रिया चित्ते  तसेच प्रास्थाविक ड्रीम स्कुल चे अध्यक्ष गजानन पाबळे यांनी केले  कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी समाधान  पाबळे तसेच शिक्षक वृद यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment