Wednesday, February 20, 2019

न.प. इमारतीला अटलबिहारींचे नाव दिल्याने मुख्यमंत्र्यांना हर्ष


 देऊळगाव राजा :  प्रतिनिधी.
         नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. न.प. प्रशासनाने इमारतीला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिल्याने मुख्यमंत्री आनंदीत झाले असून, नुकतेच त्यांनी ट्विट करून न.प. प्रशासनाचे कौतुक केले..
      आमचे नेते, श्रद्धेय अटलबिहारी यांच्या नावाने असलेल्या इमारतीचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचा उल्लेख करतानाच या मंगलमयप्रसंगी माझे सहकारी रणजित पाटील, जयकुमार रावल व संजय राठोड सोबत असल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. ३ कोटी २० लाख रुपयांच्या इमारतीचे निर्माण करताना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पावसाचे पडणारे पाणी पुनर्भरणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा अभिप्रायही त्यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने लहान लहान शहरांमध्ये वेगवेगळे प्रकल्प आणि विकासात्मक कार्यक्रम राबविण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्र सरकारने २ हजार १०० कोटींचा निधी राज्य शासनाला यासाठी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे..

No comments:

Post a Comment