Thursday, February 21, 2019

अखेर दे. राजा बसस्थानक चौकामध्ये पोलिस चौकी




देऊळगावराजा बसस्थानक चौकात उभारण्यात अालेली पोलीस चौकी. देऊळगावराजा : प्रतिनिधी
         येथील बसस्थानक चौकात अखेर पोलिस चौकी उभारण्यात आली आहे.. बस स्थानक चौक हा शहरातील मुख्य चौक असून या चौकातून जालना रोड जाफराबाद रोड चिखली रोड आहे. तर या चौकातून दररोज शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनींची ये जा करतात. त्यामुळे येथे पोलिस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी होत हाेती. 
        बसस्थानक चौकामध्ये या अगोदर पोलिस दादा नेहमीच तैनात राहत होते. नागरिकांची व शहरवासीयांची अडचण लक्षात घेत ठाणेदार सारंग नवलकर यांनी पुढाकार घेऊन या पोलिस चौकीची उभारणी केली आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असल्याची अपेक्षा नवलकर यांनी व्यक्त केली. तसेच या चौकीमुळे बस स्थानक चौकातील वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवल्या जाणार आहे. पोलिस चौकी मध्ये पोलिसांचा हेल्पलाइन नंबर असल्याने ताबडतोब नागरिकांना पोलिसांची मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून बस स्थानक परिसरात व चौकामध्ये पोलिस चौकी असावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. अखेर १९ फेब्रुवारी रोजी पोलिस चौकीला स्थापन करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा आहे.




No comments:

Post a Comment