आ. डॉ शशिकांत खेडेकर व नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांच्या प्रयत्नाना यश
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
परीसरातील लोकसहभागातून न भूतो न भविष्यातो असे आमना नदीचे खोलीकरण झाले त्यामुळे राज्यस्तरावर ह्या खोलीकरनाची दखल घेण्यात आली होती या लोकसहभागाला शासकीय निधीची जोड लागावी नदीचे सुशोभीकरण करण करण्यात यावी यासाठी पर्यटन विकास मंत्री ना. जयकुमार रावळ यांच्याकडे आमदार डॉ शशिकांत खेडेकर व नगराध्यक्ष सौ. सुनीता शिंदे यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती सदर निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी सतत प्रयत्न सुरू होते मात्र नुकतीच देऊळगाव राजा येथे ना जयकुमार रावळ यांनी भेट दिली व आमना नदीचे जे काम झाले ते पाहून आश्चर्यचकीत झाले,राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे नदी नाले कोरडे पडले या परिस्थितीत आमना नदीत पाणी आहे या कामाची पाहणी केल्यानंतर लवकरच निधी वर्ग करण्यात येईल असे त्यानी सांगितले होते अखेर दि.१९ फेब्रूवारी शा.नि.क्र.प्र.११५३ प्रादेशिक पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून नगरपरिषदेस पर्यटन विकास योजनेअंतर्गत आमना नदीच्या दोन्ही काठावर पादचारी रस्ते बांधणे रस्ता साठी ३३.६२ लक्ष, कर्ब वॉल बांधणे व रॅलीग करणे साठी २२.४३ लक्ष, स्ट्रिट लाईट लावण्यासाठी ७.०७ लक्ष, वृक्षारोपण करणे व घाट स्टेप्स बांधणे साठी १४.६० लक्ष, दगडाचे अस्तांरीकरण करणे साठी ४८ लक्ष असे एकुण १२५.७२ लक्ष रु पे त्यामुळे नदी सुशोभीकरण मध्ये आणखी भर पडणार अशी महती स्विय साहाय संतोष शिगंणे यांनी दिली.



No comments:
Post a Comment