दीपक बाजड यांची बदली; निकिता जावकर यांची नेमणूक
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागात बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. यामध्ये देऊळगाव राजा तहसिलदारांचा देखील समावेश आहे. अभ्यासू आणि दबंग अधिकारी म्हणून येथे आपली ओळख निर्माण करणारे तहसीलदार दीपक बाजड यांची बदली झाली असून त्यांच्या जागी निकिता जावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकिता जावाकर यांच्या रूपाने देऊळगाव राजा तालुक्याला महिल्यांदाच महिला तहसिलदार मिळाल्या आहेत..
तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर रेती चोरीबाबत कठोर भूमिका घेत दीपक बाजड यांनी रेतीचोरीला आळ बसविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांची अकोला जिल्ह्यातील पातूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या निकिता जावरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकिता जावरकर ह्या माँ जिजाऊचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघातील पहिल्या महिला तहसीलदार ठरल्या आहेत..


No comments:
Post a Comment