देऊळगांव राजा (प्रतिनिधी)
काळाची गरज ओळखून देऊळगावराजा शहराची शिक्षणाची भूक भागविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात १९३४ ला स्थापन झालेली देऊळगावराजा शिक्षण संस्था देऊळगावराजा द्वारा संचालित देऊळगावराजा हायस्कूल ने देऊळगावराजा शहरात शैक्षणिक क्रांती करत हजारो विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवून विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने जडणघडण करत देऊळगाव राजा हायस्कूलने समाजासमोर गुणवत्तेचा आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले.
कार्यक्रमात सर्वप्रथम पुलवामा हल्ल्यातील शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.स्थानिक देऊळगावराजा हायस्कूल देऊळगावराजा येथे वर्ग दहावी ,बारावी तथा इतर सहशालेय उपक्रमातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.जुगलकिशोर धन्नावत हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मा. ना. डॉ. रणजीत पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री. विलास राजे जाधव,तसेच श्री. मोरेश्वर मीनासे, जगदीशजी कापसे, संस्थेचे संचालक श्री. नंदन मिश्रीकोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मार्च २०१८ च्या परीक्षेत शेकडा ९८% टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला चि. यशराज किशोर पवार, कु. विद्या गजानन केकान ९६.०४ %, शिवराज राजेश चाटे ९६. ८०%, व्यंकटेश दत्तात्रय बुरकुले ९६. ०२ %,दिपाली उद्धव नागरे ९६% ,यश खेडेकर , कुस्ती या क्रीडाप्रकारात राज्यपातळीपर्यंत पोहोचलेला संघपाल मधुकर सोनूने , उत्कृष्ट वक्ता पुरस्कार कु. आकांक्षा गजानन जायभाये व कु. सोनिया धनंजय मस्के, स्काऊट राज्य पुरस्कार प्राप्त राजेश जायभाये, अनिकेत घुगे ,जीवन जायभाये,स्कॉउटर श्री. प्रेमचंद राठोड तर एच. एस .सी. मधील गुणवंत .कु पल्लवी पडघान विज्ञान शाखेत ८९ %, कला शाखा कु. सीमा सेरे ९२% ,मारुती बोरकर एम.सी.व्ही.सी. ८६% ,धनश्री उपाध्ये ,युद्धेश रेशवाल, संतोष बंगाळे इत्यादींना रोख पारितोषिक देऊन उचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात कु. भूमिका बंग हिचे स्वागत गीत उल्लेखनीय ठरले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. एम. आर. थोरवे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष सेवा परमो धर्म हा उदात्त हेतू समोर ठेवून संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री. आर .बी. कोल्हे व प्रा. सुशीलकुमार इंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन जनाबापू मेहेत्रे यांनी तर आभार पर्यवेक्षक श्री. डी .ए.खांडेभराड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment