नवनिर्मिती फाऊंडेशनचा अनोक उपक्रम
राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, उद्योग क्षेत्रात कार्य करणाºयांचा हा सन्मान
देऊळगांवराजा : प्रतिनिधी
रत्नागीरी जिल्ह्यातील उक्षी शहरातून नवनिर्मिती फाऊंडेशनचा प्रसार आणि प्रचार बघता बघता पुर्ण महाराष्टत झाला. सामाजिक, कला, क्रिडा, आरोग्य, पर्यावरण, पत्रकार, शिक्षण आदी क्षेत्रात गेली १२ वर्षापासून कार्य करीत आहे. यावर्षी आदर्श महिला पत्रकार रत्न पुरस्कारासाठी मॉ जिजाऊंच्या मतदार संघात गेल्या १२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात आपला अगळा वेगळा ठसा उमटविणाºया जिल्ह्यातील एकमेव पत्रकार सुषमा राऊत यांना अंबेड जि.रत्नागीरी येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दि.१६ फेब्रूवारी रोजी अंबेड जि.रत्नागीरी येथील भव्य मैदानात नवनिर्मिती फाऊंडेशनच्या १२ व्या वर्धापना दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करणाºया मान्यवारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेता तथा पालकमंत्री उदय सामंत होते तर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार राजन साळवी, आमदार सदानंदजी चव्हाण, आमदार सौ.हुसना बानू खलिपे, जि.प.सदस्य उदय बने, सहसंपर्क राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, पोलिस अधिक्षक सुरेश मेंगडे, पोलिस अधिक्षक रत्नागीरी डॉ.प्रविण मुंडे, परिवाहन अधिकारी विनोद चव्हाण, पं.स.सभापती सोनाली निकम, जि.प.सदस्य माधवी गिते, पं.स.सदस्या वेदांती पाटणे, सरपंच नुतन शिगवण, पं.स.सदस्य पर्युराम वेल्ये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनिर्मिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी केले. न्यू व्हिजन इंग्लिश मेडीयम स्केलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक र्काक्रम सादर केले. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलतांना उदय सामंत म्हणाले की, नवनिर्मिती फाऊंडेशन गेल्यास १२ वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. या संघटनेत काम करणाºया प्रत्येक सदस्यांचा मोठे योगदान आहे. आमच्या सारखे राजकीयाना सामाजिक हित जोपसताना पत्रकाराच्या लेखणीची धारेतून आम्हाला कार्याची पोच पावती मिळत असते म्हणूनच मातृतीर्थ बुलडाणा जिल्हयातून आलेल्या मॉ जिजाऊची लेकीला आदर्श महिला पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हि बाब आमच्या कोकण वासीयांना अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. यावेळी २५ राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाºया मान्यवरांच्या हस्ते गौरवनियात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश गांधी यांनी केले ती आभार डॉ.सय्यद गोलंदाज यांनी मानले. यावेळी रत्नागीरी जिल्हयातील नागरिक, पत्रकार उपस्थित होते.



No comments:
Post a Comment