स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष मधुकर शिंगणे, तालुका अध्यक्ष गणेश शिंगणे यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा..!
देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)
जालना जिल्ह्या साठी ११८ कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन पदाधिकाºयांनी संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला होता. या आंदोलनाच्या घोषणेमुळे खडकपूर्णा पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमाने सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढली. दि.२५ फेबू्रवारी रोजी लेखी आश्वासनानांतर जलसमाधी आंदोलन स्थगित..!
संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पामधून जालना परतूर, मंठा शहरासह ९२ गावांना पाणीपुरवठा करणाºया मुख्यमंत्री वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजना तत्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा संत चोखा सागरात जलसमाधी घेऊ असा निवार्णीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मधुकर शिंगणे व तालुका अध्यक्ष गणेश शिंगणे यांनी तहसीलदार दीपक बाजड यांना दिला होतो. दि.२५ फेब्रुवारी रोजी परिसरातील शेतकºयांच्या हक्काच्या पाण्यासाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जलसमाधी घेणार असा कळाताच. आंदोलन स्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त,जलसमाधी आंदोलनास प्रशासनाकडून विरोध करीत स्वभिमानीच्या दोन्ही पदाधिकाºयांना धरणात जाण्यापासून रोखले..! खडकपूर्णा प्रकल्पातून सुरू असलेल्या जालना जिल्हा ब्रीड पाणी पुरवठा योजना पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने लोकशाही मागार्ने सुरू असलेल्या आंदोलनास प्रशासन जुमानत नाही. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा हुकूमशाही मागार्ने खडकपूणार्तून पाणी पळवण्याचा घाट सुरूच आहे. प्रशासनाने तत्काळ या नियमबाह्य आणि ठोकशाहीने सुरू असलेली पाणीपुरवठा योजना रद्द करावी, या मागणीसाठी..! दि. २५ फेब्रूवारी रोजी रोजी धरणाच्या भिंतीवर दोन तास ठिय्या आंदोलन, आंदोलन कर्ते मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, यांचेसह स्वाभिमानी चे युवा जिल्हा अध्यक्ष सतिष विष्णु मोरे, शेख जुल्फिकार शेठ, कुंडलिक मामा शिंगणे, शेणफड पाटील, पंढरीनाथ म्हस्के, भानुदास घुबे, देविदास शिंगणे, किशोर शिंदे, गजानन रायते, शेख गुलाम नबी, अंबादास बुरकुल, प्रवीण राऊत यासह अन्य शेतकरी बांधवांचा सहभाग..!
पाणी पाऊच वाटप करुन आंदोलन करणार : सतिष मोरे
या नंतरही प्रशासनाने बळाचा वापर करून काम सुरु केल्यास पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या घरासमोर स्वाभिमानीच्या वतीने पाणी पाऊच वाटप आंदोलन करण्याचा जिल्हा युवा अध्यक्ष सतिष विष्णु मोरे यांचा इशारा..


No comments:
Post a Comment