Monday, February 25, 2019

गिरोली ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आत्मदहनाचा ५३ नागरिकांनी केला प्रयत्न

   
लेखी आश्वसना नंतर आत्मदहन मागे  
 देऊळगावराजा : (प्रतिनिधी) 
       तालुक्यातील गिरोली बुद्रूक ते निमखेड रस्त्याची प्रचंड दुर्दशा व राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर न झाल्याने संतप्त नागरिकांनी या रस्त्याकडे व राष्ट्रीय पेयजल योजना मंजूरीकडे दुर्लक्ष करणाºया लोकप्रतिनिधी व प्रशासना विरोधात दि.२३ फेब्रूवारी रोजी गिरोली फाट्यावर येवून प्रचंड घोषणाबाजी करत ५३ ग्रामस्थानी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अखेर लेखी आश्वासना नंतर आत्मदहन मागे घेण्यात आले.  
         देऊळगावराजा शहराच्या अवघ्या ५ किमी असलेल्या गिरोली बुदु्रूक फाटा ते निमखेड पर्यंत दोन किमी. रस्त्याचे चार महिन्यापूर्वी डांबरीकरण झाले होते. मात्र काही दिवसांतच डांबर उखडून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले. दुचाकी व चारचाकी वाहनांसह शाळकरी मुलांना सायकलीने जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. तसेच मानव विकास योजने अंतर्गत मुलींसाठी सुरु असलेली बस सेवा ३ वर्षापासून रस्ता खराब झाल्याने बंद आहे. त्यामुळे ग्रमस्थांनी नहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गटग्रमपंचायत गिरोली बु. व निमखेड या दोन्ही गावामध्ये १५ वर्षापासून नळ योजना बंद पडलेली आहे. गावकºयांना पाण्यासाठी वनवन भटकांती करावे लागत आहे. त्वरीत राष्ट्रीय पेयजल योजना मंजुर करुन दोन्ही गावाला पाणी पुरवठा सुरु करुन देण्यात यावा या मागणीसाठी दि.२३ फेबू्रवारी रोजी गिरोली आणि निमखेड येथील नागरिकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता अखेर प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देवून आत्मदहन मागे घेण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रशाद शेळके, तालुकाध्यक्ष राजीव सिरसाट, पंचायत समिती उपसभापती हरीष शेटे, राष्ट्रवादी युवानेते तथा सभापती पती गजेंद्र शिंगणे, शिवसेना नेते जगदीश कापसे, शहरप्रमुख मोरेश्वर मिनासे, गिरोली आणि निमखेड येथील ग्रामस्थ या आंदोलनात पाठींबा देवून नगरिकांन सोबत राहिले.आत्मदहन करणारे ग्रामस्थ लक्ष्मण कव्हळे, हर्षवर्धन देशमुख, परमेश्वर कव्हळे, संजय जाधव, संतोष जाधव, हरीचंद्र झोरे, बाबासाहेब झिने, विकास कव्हळे, नामदेच मगर, हरीभाऊ सोनूसे, गौतम झिने, शिवाजी चव्हाण, विठ्ठल झिने, रामदास पिटकर, पाडुरंग सानप, एकनाथ कव्हळे, माणिक झिने, ज्ञानेश्वर शिंदे, काकासाहेब कव्हळे, प्रल्हाद देशमुखसह ५३ ग्रामस्थ उपस्थित होते. 



No comments:

Post a Comment