शिवसंग्रामची अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार
देऊळगांव मही : गजानन चोपडे
देऊळगांव मही येथील रहिवासी असलेले व त्यांच ठिकाणी अनेक वर्षांपासून विद्युत वितरण कंपनीत लाईनमन पदावर कार्यरत असलेले मंगेश होमपारखे हे वीज बिलाच्या नावाखाली जनतेची लूट करून आर्थिक भ्रष्टाचार करत असुन आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करून तात्काळ बदली करावी अशी मागणी आज शिवसंग्राम संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता म.रा.वी.वी.कं. मर्यादित बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत नमूद आहे की, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगांव मही येथील रहिवासी व तेथेच अनेक वर्षांपासून महावितरण कंपनीत लाईनमन पदावर कार्यरत असलेले मंगेश होमपाखरे हे गोर गरीब जनतेला नाहक त्रास देण्याचे काम करत आहे.विद्युत बिलाच्या नावाखाली जनतेची आर्थिक लूट करत आहे. तुमचे बिल मी भरतो अर्धे पैसे माज्याकडे द्या,मी पावती आणून देतो असे सांगत जनसामान्यांची आर्थिक लूट करून दिवसा ढवळ्या आर्थिक भ्रष्टाचार करत आहे.सदर कर्मचारी स्थानिक असल्याने आपल्या कामावर हजर राहत नाही. त्यामुळे वीज ग्राहकांचे कामे मार्गी लागत नाही. याबाबत त्यांना विचारणा केल्यास ते उडवाउडवीची उत्तरे देतात, कुठेही जाऊन कोणाकडेही माझी तक्रार करा, माझे कोणीच काहीच करू शकत नाही. असे उद्धटपणे सामान्य जनतेशी वागत आहे.मीटरचे साधे नाव जरी बदलायचे असेल तर मंगेश होमपाखरे हे वीज ग्राहकांकडून ८०० ते १००० रूपायांची मागणी करतात. या भ्रष्ट कर्मचाºयामूळे जनता त्रस्त झाली आहे.आशा भ्रष्ट व आपल्या कर्तव्यात कसूर करणाºया कर्मचाºयावर कठोर कारवाई करावी, व त्यांची देऊळगांव मही येथून दुसºया ठिकाणी बदली करण्यात यावी.अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. सदर निवेदनावर शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहीर खान, अजमत खान, विनोद खार्डे, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे, गजानन खार्डे, आयाज खान, मदत डुरे यांच्या स्वाक्षºया आहे.


No comments:
Post a Comment