माहिती मागितल्यास तहसीलदार कणसे कडुन जीवे मारण्याची धमकी,
भाजपा पदाधिकारी वाघ यांनी जिल्हाधिकारी कडे केली तक्रार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “ड्रीम प्रोजेक्ट” असलेला नागपुर ते मुंबई पर्यंत नवीन होणारा समृद्धि महामार्गाच्या अधिग्रहण प्रक्रियेत अनेक प्रकारे अधिकाऱ्यांनी हात माळवणी करुण मोठ्या प्रमाणात भरष्टाचार केला,असा आरोप विरोधी पक्षाकडून होत असतानाच आता सिंदखेडराजा तालुक्यात ही हा भरष्टाचार स्थानिक तहसीलदार संतोष कणसे यांनी केला असून त्याची माहिती अधिकारात माहिती मागितली असता ते जीवे मारण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकुन देण्याची धमकी देत असल्याची लेखी तक्रार भाजपाचे पदाधिकारी समाधान आनंदराव वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्या कडे केेली आहे.
दि. २२ फेब्रूवारी रोजी विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन हाती घेतलेला प्रकल्प आहे. याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन अतिशय सकारात्मक आहे, परंतु तहसीलदार सिंदखेडराजा यांनी या कामात खुप मोठ्या प्रमाणात भरष्टाचार केला आहे.कोरडवाहु जमीनी बागायती दाखविणे,झाडांची संख्या वाढविणे, शेतात पाईपलाईन नसतांना ही पाईपलाईन दाखविणे, तसेच नर्सरितून ५-५ वर्षाच्या कलमा आणून उभे करुण त्याचे बोगस बिले काढणे, अशा अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणावर कोठयावधी रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे. या संपुर्ण प्रकारची समाधान वाघ यांनी माहिती अधिकारा अंतर्गत दि. २४ जानेवारी २०१९ रोजी समुद्री महामार्गा बाबतची माहिती मागितली आहे. त्या माहितीची विचारपूस करण्याकरिता त्यांचा मुलगा नामे प्रशांत वाघ हा तहसील कार्यालयात गेला असता तहसीलदार कणसे यांनी अरेरावीची भाषा वापरून तुझ्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करुण तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही, यापुढे तू तहसीलच्या आवारात जरी दिसला तरी तुला सोडणार नाही, मी आमदार, खासदारांनाच काय मुख्यमंत्र्यांना पण काही समजत नाही, अशा प्रकारे भाष्य करुण जीवे मारण्याची धमक्या दिल्याचा आरोप निवेदनात केला. हा सर्व प्रकार दि.१२ फेब्रवारी रोजी अंदाजे २ वाजता तहसील कार्यालयाच्या CCTV फुटेज मध्ये उपलब्ध आहे. माझ्या सारख्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर यावरून इतरांना कशी वागणूक मिळत असेल? याची कल्पना करू शकत नाही. अशा प्रकारे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मला जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या आहे, तहसीलदार कणसे पासून मला व माझे कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. आपले स्तरावरून सखोल चौकशी करून तहसिलदार सिंदखेडराजा संतोष कणसे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येऊन शासनाची केलेल्या फसवणुकीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाधान वाघ यांनी केली आहे.या प्रकरणी तहसीलदार संतोष कणसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.
“समृद्धिचा” काम पाहणारे अधिकारी झाले “समृद्ध”
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर,लोणार, सिंदखेड राजा व देळगांव राजा या 4 तालुक्यातुन समृद्धि महामार्ग जात आहे.बुलडाणा जिल्ह्यात याची लांबी 85 किलोमीटर असणार.या चारही तालुक्यातील हजारों शेतकऱ्यांची जमीन शासनाने अधिगृहित करुण त्या शेतकऱ्यांना मुबलग मोबदला दिला हे खरे,पण आपल्या आर्थिंक फ़ायद्या साठी काही भरष्ट अधिकारी यांनी नियमा पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मोबदला दिला व त्यातून आपली टक्केवारी घेतली आहे.”समृद्धि” महामार्गाचा काम करुण “समृद्ध” झालेल्यांची खऱ्या अर्थाने चौकशी होने गरजेचे आहे.


No comments:
Post a Comment