शिवसंग्राम संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
देऊळगांव राजा :- प्रतिनिधी
दुष्काळ परिस्थितीत देऊळगांव राजा शहरासह तालुक्यात शेतकऱ्यांकडे आणि सर्व सामान्य जनतेकडे बँकांची सक्तीने थकीत कर्ज वसुली व महावितरणाची विद्युत बिलाची थकीत वसुली करण्यात येत आहे. ही वसुली तात्काळ थांबवावी,अशी मागणी आज दि.२८ शिवसंग्राम संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे.विदर्भात दुष्काळाची तीव्रता जास्त आहे.शासनाने देऊळगांव राजा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला आहे.असे असतांना देऊळगांव राजा शहरासह संपूर्ण तालुक्यात बँकामार्फत बँकेचे वसुली अधिकारी शेतकऱ्यांकडून व सामान्य जनतेकडून सक्तीने थकीत कर्जाची वसुली करत आहे.बँकेचे वसुली अधिकारी शेतकऱ्यांच्या सह्या,अंगठे घेत आहे.फॉर्म इंग्रजीत असल्याने आपल्या सह्या कशासाठी घेतल्या हे शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.तसेच महावितरणाचे अधिकारी,कर्मचारी देखील "मार्च एंड" च्या नावाखाली शेतकरी व विद्युत ग्राहक यांना वेठीस धरून त्यांच्याकडील थकीत विद्युत बिल सक्तीने वसूल करत आहे.बिल न भरल्यास हे अधिकारी विद्युत पुरवठा कट करून टाकत आहे.यामुळे शेतकरी,सामान्य जनता हवालदील झाले आहे.आशा परिस्तितीत शासनाने शेतकऱ्यांच्या व जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.एकंतरीत दुष्काळ परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांकडे असलेले विद्युत बिल,पीक कर्ज,मध्यम कर्ज व इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जाची रक्कम सध्या शेतकऱ्यांकडून वसुल करण्यात येवू नये.तसेच बँकांनी यामध्ये ढवळाढवळ करून जनतेला वेठीस धरू नये.महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी बिल वसुलीसाठी शेतकरी,जनतेकडे तगादा लावू नये.अशी मागणी सदर निवेदनाद्वारे तहसील प्रशासनाकडे शिवसंग्राम संघटनेने केली आहे.अन्यथा शिवसंग्राम संघटना शेतकरी,वीज ग्राहकांना सोबत घेऊन टोकाचे पाऊल उचलेल व तीव्र आंदोलन करेल त्यास प्रशासन,बँक,महावितरण जबाबदार राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे.सदर निवेदनावर शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहीर पठाण, अजमत पठाण, विनोद खार्डे, संतोष हिवाळे, गजानन खार्डे, सुरेश निकाळजे, आयाज पठाण, आरिफ पठाण,मदन डुरे, शंकर शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.



No comments:
Post a Comment