Sunday, March 3, 2019

उपोषणकर्तेच करतात पैशाची मागणी...!



डिग्रस बुदू्रक रेती वाहतूकदार रविंद्र लाड यांची पुराव्यानिशी पोस्टेला तक्रार
ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांचा सहभाग,
उपोषण स्टंट बाजीने खळबळ 
देऊळगांवराजा :  प्रतिनिधी 
         गेल्या काही दिवसापूर्वी तालुक्यातील डिग्रस बु. येथील रेती वाहतूकदार आणि स्थानिक ग्रामपंचायत उपसरंपच आणि काही सदस्यां मध्ये घेवान देवाण वरुन शाब्दीक मतभेद सुरु होते. याबाबत ग्रामस्थांना व संबधित विभागास नाहक स्वहित जोपासण्यसाठी वेढीस धरले जात होते. तर दि.२० फेब्रूवारी रोजी खडकपूर्णा नदी पात्रात उपोषण करण्यात आले. तिन दिवस सुरु असलेल्या उपोषणला माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिली त्यांच्या मध्यस्ती मुळे उपोषण मागे घेण्यात आले. पण त्वरीत उपोषकर्त्यांनी पाठपुरावा करणार नाही यासाठी २ लाख ५० हजार रुपये प्रत्येक सदस्यांना देण्याची उपोषणकर्त्यानी केली त्या मागणीला भिक न घालता अखेर रविंद्र लाड यांनी पुराव्यानिशी पोस्टे देऊळगावराजा आणि अंढेरा येथे तक्रार केली आहे. उपोषणच्या, स्टंट बाजीने तालुक्यात चर्चेला उधान आले आहे.
        सविस्तर असे की, तालुक्यातील डिग्रस बु. ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ.छाया टेकाळे, गजानन रामकिसन टेकाळे, सौ.मिरा गावंडे, संतोष पºहाड, संतोष गावंडे, बाबुलाल वाळ हे सर्व जण खडकपूर्णा नदी पात्रात दि.२० फेब्रूवारी रोजी रेती वाहतूक करणाºयांच्या विरोधात उपोषणास बसलेले होते. त्या उपोषणाची दखल घेत माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले होते. परंतु उपोषणकर्त्या पैकी लक्ष्मण एकनाथ पºहाड सदस्य ग्रामपंचायत यांनी ९०११५५००५२ या मोबाइल क्रमांकावरुन रविंद्र लाड रेती वाहतूकदार व्यावसायीक यांना उपोषण मागे घेत आता तुमची महसूनची मोजमाप होवून कोटीने दंड वसुल केल्या जाईल. तुम्हाला हे टाळण्यासाठी आमचे प्रत्येकाला अडीच लाख रुपये प्रत्येक उपोषणकर्त्यांना द्या आमची दिलेली तक्रार मागे घेतो तुम्ही सर्व रेती वाहतूक करणणारे व्यवासायीक अधिकारी आणि तलाठी सर्वजण मिळून आमची पैशाची मागणी पूर्ण करा असे मोबाईलवर संभाषण केले. तसेच यापूर्वी ही अशाच प्रकारे उपोषणाच्या धमक्या देवून आम्हाला नाहक त्रास देण्याचे का हे पाच जण करित आम्ही त्यांची पैशची मागणी पूर्ण न केल्यास तुम्हाला करोडच्या दंड होणार तुम्ही फक्त १२ लाख द्या. अखेर रेती व्यवासायीकांनी अंढेरा आणि देऊळगावाजा पोस्टेला रितसर पुराव्यानिशी तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
          उपोषणकर्ते करीत आहे, शासनाची आणि नागरिकांची दिशाभूल 
        गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीचा सर्वात मोठा योगदान असतो आणि सरपंच, उपसरपंच आणि सदस्य सर्व मिळून गावाच्या विकास करण्या एवजी उपसरंपच आणि काही सदस्य उपोषणाची स्टंट बाजी व पैशाची मागणी करुन शासनाची आणि नागरिकांची दिशाभूल करीत आहे. स्वहित  साधण्यासाठी जनतेचे बळी देण्याचे काम डिग्रस बुदू्रक येथील उपसरंपच, आणि काही सदस्य करीत असल्याची खंमग चर्चा तालुक्यात रंगली आहे. पोलिस प्रशासन व महसूल विभाग यांच्या विरोधात कोणती कारवाई करतात यांवर लक्ष लागुन आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील अनेक संघटनेनच्या उपोषणाचे इशाºयांने त्यांचच तंबुत चांगली घबराहट निर्माण झाली आहे. उपोषणानाचे इशारे आता आर्थिकतेची स्टंट बाजी झालेली आहे. अशी पण चर्चा रंग पंचमी अधीच रंग उधळत आहे.    

No comments:

Post a Comment