आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश.
देऊळगांव राजा : प्रतिनिधी
भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील आमना नदीवर को.प.बंधाऱ्यांची सतत मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेता आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी शासन दरबारी तसेच सभागृहात सतत पाठपुरावा केला.
मा.खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमना नदीवर १२ को.प.बंधारे प्रस्तावित केले. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील अंभोरा, जांभोरा, असोला जहागीर, चिंचोली बुरकुल व गोंधनखेड येथील एकूण ५ द्वारयुक्त को.प. बंधाऱ्यांसाठी ४ कोटी ६७ लक्ष ८२ हजार 920रुपयांचे को.प.बंधारे मंजूर झाले आहेत.उर्वरित ७ बंधाऱ्यांना लवकरच मंजुरात मिळणार आहे.सदरहू मंजूर झालेल्या बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच या बंधाऱ्यांची कामे पूर्ण होतील. सदरहू बंधाऱ्यांमुळे आमना नदिवरच्या गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.अशी महिती स्विय साहायक , संतोष सुदाम शिगंणे यांनी दिली.



No comments:
Post a Comment