शिवसंग्राम संघटनेची तहसीलदारांकडे मागणी
देऊळगांव राजा : प्रतिनिधी
तालुक्यातील भीषण पाण्याची टंचाई लक्षात घेता ग्रामीण भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याची तात्काळ अंमलबजावणी करा व गुरांच्या चारा-पाण्यासाठी तालुक्यात चारा छावण्या सुरु करून दुष्काळावरील उपाययोजना तात्काळ राबविण्यास सुरवात करण्याची मागणी आज शिवसंग्राम संघटनेने तहसीदार दीपक बाजड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा जन आंदोलन छेडू असा इशारा शिवसंग्रामचे तालूका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसील प्रशासनाला दिला आहे.
यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तालुक्यात दुष्काळची तीव्रता वाढली आहे.तालुक्यातील अनेक गावे दुष्काळ परिस्थितीचा व पाणी टंचाईचा सामना कसा करावा या चिंतेत आहे.दुष्कळाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वच गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.गावाला पाणी पुरवठा करण्याऱ्या विहीर कोरड्या पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.ग्रामीण भागातील महिला डोक्यावर हंड्याने पाणी आणत आहे.पाण्याची भीषण टंचाई वाढत असल्यामुळे ग्रामीण जनतेचे जीवन हलाखीचे झाले आहे.तसेच भीषण पाणी टंचाईमूळे गुरांना चारा व पाणी उपलब्द होत नसल्याने जनावरांची उपासमार होत आहे.आशा परिस्थितीत जनावरे जागविणे शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे.तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ती उग्ररुप धारण करण्यापूर्वी वेळीच शासनाने उपाययोजना करून त्यांची अमलबाजवणी करावी.त्यासाठी शासनाने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जनावरांच्या चारा-पाण्यासाठी तात्काळ ग्रामीण भागात चारा छावण्या सुरू कराव्यात.तसेच गावातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मजूर करून पाणी पुरवठा सुरू करावा.अशी मागणी आज शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा शासनाच्या धोरणाविरोधात जन आंदोलन छेडू असा इशारा देखील देण्यात आला आहे.सदर निवेदनावर शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,तालुका संघटक जहीर पठाण,अल्प संख्याक अध्यक्ष अजमत पठाण,विनोद खार्डे,संतोष हिवाळे,गजानन खार्डे, मदन डुरे,आयाज पठाण,अनिस पठाण,आरिफ पठाण,सुरेश निकाळजे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.


No comments:
Post a Comment