कृषि उत्पन्न बाजार समितीला .स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा घंटानाद आंदोलनाचा इशारा
देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)
कृषीउत्पन बाजार समीतीवर एक हाती राष्टवादी ची सत्ता स्थापीत झाल्यानंतर मा.मंत्री डाँ राजेद्र शिंगणे यांनी आपल्या अभीवचनात शेतकºयांना त्यांच्या हिताच्या घोषना केल्या होत्या .त्यामधे शेतकºयांसाठी अल्पदरात भोजन व्ववस्था केली जाईल असे वचननामा दिला होता . परंतू अद्यापही त्या घोषनेची कोणतीही पुतँता न केल
याने दि.७ फेबू्रवारी रोजी स्वाभीमानी चे युवा अरघाडी जिल्हाध्यक्ष सतीष मोरे यांनी भोजनव्यवस्था सुरू न झाल्यास घंटानाद आंदोलनाचा ईशारा दिला आहे .
स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समिती कपाशीच्या विक्रीसाठी विदर्भ व मराठवाड्यात प्रसिध्द अशी बाजारपेठ आहे. इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कृषि उत्पन्न बाजार समिती येथे कपाशी पिकाला जास्त भाव मिळत असल्याने देऊळगाव राजा तालुक्यासह आजूबाजूच्या इतर तालुक्यातील शेकडो शेतकरी कापूस विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समिती येथे हजारो क्विंटल कापसाची आवक होऊन कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. तसेच भुसार बाजारामध्ये सुध्दा शेतकरी आपल्या सोयाबिन, मका, तुर, हरभरा यासह अन्य शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. शेतमाल विक्रीपासून ते पट्टी बनवून चुकारे घेण्यापर्यंतचे व्यवहार पार पाडण्यासाठी शेतकºयांना दिवसभर बाजार समितीच्या आवारात थांबावे लागत असल्याने त्यांचे जेवणाची, अल्पोहाराची समस्या निर्माण होत आहे. या सर्व व्यवहारामधून कृषि उत्पन्न बाजार समितीला महसुलाचे माध्यमातून मोठा निधी प्राप्त होत आहे. परंतु कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ या मोबदल्यात शेतकºयांना पुरेश्या सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निर्वाचित व सध्या कार्यरत असलेल्या सभापती, संचालक मंडळाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकºयांसाठी अल्पदरात भोजन व्यवस्था सुरू करण्याचे दिलेले आश्वासन तिन वर्षे पूर्ण होऊन सुध्दा अद्यापपर्यंत पूर्ण केले नाही. तरी या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करून शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती खामगांव आणि लोणार प्रमाणे अल्प दरामध्ये भोजन व्यवस्था सुरू करावी. अन्यथा आपल्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. १८ फेब्रूवारी रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल..! असा इशारा सतिष विष्णू मोरे- युवा जिल्हा अध्यक्ष बुलडाणा, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, पंढरीनाथ म्हस्के, रमेश नरोडे, शिवाजी सिरसाट यांनी बाजार समितीचे सभापती सभापती महेश देशमुख यांना निवेदनद द्वारे दिला आहे. याप्रसंगी माजी सभापती नितीन शिंगणे, संचालक भगवान आमटे, गजानन पवार, गणेश बुरकुल यांची उपस्थिती होती ..!
डॉ.शिंगणे यांनी दिलेल्या, शब्दांना केराची टोपली...
तिन वर्षा पूर्वी माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी वेळी आपल्या पक्षाच्या वचननाम्यात शेतकºयांसाठी सोयी सुविधा देणार असा अश्वासन दिला होता. परंतु तब्बल तिन वर्ष पूर्व होत आले तरी ही डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या शब्दाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. तिन सभासपती बदलले तरीही शेतकºयांच्या हिताची चिंता कोणाला दिसत नाही. म्हणूनच स्वभिमानी पक्षाकडून हा पाऊल उचलण्यात ओलला आहे. शेतकºयांच्या हितासाठी स्वातभमानी पक्ष उभा असून येणाºया काळात निवडणुकात शेतकरी कोणा सोबत राहिल येणाºया काळात जनते समोर येणार आहे.


No comments:
Post a Comment