Wednesday, February 6, 2019

पर्यावरण पूरक मैत्रीचा संदेश देण्याकरिता हजार किलोमीटर सायकलचा प्रवास

देऊळगांवराजा :  (प्रतिनिधी)                                                                                        भारत देशात वाढती लोकसंख्या त्याचबरोबर वाढती वाहनांची संख्या त्यामुळे होणा रे प्रदूषण याचे परिणाम निसर्गावर होत असून मानवाच्या आरोग्यावर सुद्धा याचा फार मोठा परिणाम होत आहे, संपूर्ण भारतात युद्धपातळीवर महामागार्चे काम सुरू असून यामध्ये लाखो वृक्षांची कत्तल झालेली आहे. याचासुद्धा पर्यावरणावर फार मोठा परिणाम झालेला आहे. यावर सर्वदूर जनजागृती करण्याकरिता व पर्यावरणाचा संदेश देण्याकरिता मुंबई येथील ७२ वषार्चे उच्चशिक्षित किशोर मेहता व अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले पर्यावरण प्रेमी राजन फोन्सेस्का हे दि.१ फेब्रूवारी रोजी सायकल वरून वसईतून प्रवासास निघाले असून दि.१० फेब्रूवारी रोजी ते एक हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नागपूरला पोहोचणार आहेत. 
          दि.५ फेब्रूवारी रोजी त्यांचे श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत आगमन झाल्यानंतर त्यांचे अन्नछत्र सेवा समितीचे प्रमुख अनंत काटकर यांनी स्वागत करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली तर चर्चेमध्ये त्यांनी पर्यावरण बाबत व हेल्थ बाबत सखोल मार्गदर्शन करून सायकल चालविण्याचे अनेक फायदे असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले तर पेट्रोल व डिझेलवर चालणारी वाहने हे जास्त प्रमाणात वायू प्रदूषण करत असून याचा मानवी शरीरावर फार मोठा परिणाम होत आहे निरोगी जीवन जगण्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन भविष्यात पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने बंद करून इलेक्ट्रॉनिक्स वाहनांचा वापर कसा वाढेल यावर मंथन करण्याची गरज असल्याचे सांगून सन २०२० मध्ये युरोप नेदरलँड स्वीडन नार्वे डेन्मार्क या देशांनी त्यांच्या देशात पेट्रोल-डिझेल मुक्त वाहन करण्याचा संकल्प केला असून २०२० मध्ये या देशांमध्ये केवळ इलेक्ट्रॉनिक्स व सीएनजी गॅस वर चालणारी वाहने चालतील असे नियोजन केले आहे पर्यावरण मैत्रीचा संदेश देणारे राजन फोन्सेस्का हे ३६ वषार्चे असून एमबीए पर्यंत शिक्षण घेऊन सद्यस्थितीत अमेरिकेत हेल्थ सेफ्टी ईनवारमेंटल मध्ये आॅफिसर म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून कार्यरत आहेत तर दुसरे पर्यावरण मित्र किशोर मेहता हे ७२ वषार्चे असून त्यांनी १९६८ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे सद्यस्थितीत यांनी ३० देशात फ्रीलान्स मॅनेजमेंट कन्सल्टंट चे काम सुरु केले आहे या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या देशात शेकडो मोठमोठ्या कंपन्यांचे सेट अप करून दिले आहे त्यांचे मुख्यालय दुबईमधील अबुधाबी येथे आहे वसई मध्ये जेव्हा जेव्हा ही मंडळी परत येते त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या ग्रुपच्यावतीने हेल्थ सेफ्टी एन्व्हायरमेंट अंड सेफ्टी स्किल ट्रेनर चे काम करीत आहे महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्यांनी आतापर्यंत सायकल वर हजारो किलोमीटरचा प्रवास केला असून ठिकठिकाणी ते पर्यावरण व आरोग्य याबाबत जनजागृती करीत आहेत,श्री बालाजी महाराज मंदिरात त्यांचा संस्थानचे वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी राजेश खांडेभराड, सन्मती जैन, जुगल किशोर हरकूट, अनंत काटकर,संतोष पिंपळे, उपस्थित होते, 


No comments:

Post a Comment