देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)
जायंट्स वेलफेयर फाउंडेशन मधील देऊळगाव राजा जायंट्स ग्रुप च्या अध्यक्षपदी तुकाराम बोले, सहेलीच्या अध्यक्षपदी लता हरकूट व यंग जायंट्स च्या अध्यक्षपदी संचित धन्नवत यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे या तिन्ही अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांना दिनांक ३ फेब्रूवारी रोजी फेडरेशन अध्यक्ष अशोक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ देऊन पदग्रहन करण्यात आला
कार्यक्रमात या ग्रुपने २०१९ मध्ये २ मानद सदस्यांची निवड केली आहे त्यामध्ये सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे व ललित कोटेचा यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर असे की आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्थेची स्थापना विश्व उपाध्यक्ष नाना चुडासामा यांनी १९९२ मध्ये करून त्यांच्या शाखा विदेशांत सुरू केल्या,शहरात सन १९९४ मध्ये जायंट्स ग्रुप ची स्थापना झाल्यानंतर विविध उपक्रम या ग्रुपने राबविले यावर्षी हया ग्रुप च्या अध्यक्षपदी तुकाराम बोले आणि सहेली च्या अध्यक्षपदी लता हरकूट यांची तर यंग जायंट्स च्या अध्यक्षपदी संचित धन्नावत याची निवड करण्यात आली नवीन कार्यकारीनी ला दिनांक तीन दोन १९ रोजी विश्व उपाध्यक्ष दिनेश मालाणी,स्पेशल कमेटी सदस्य विनोद सेवतेकर,पुरुषोत्तम धनांवत फेडरेशन अध्यक्ष अशोक थोरात उपाध्यक्ष जुगल किशोर हरकूट, युनिट डायरेक्टर सन्मती जैन, अमित सराफ आणि बाबू सेठ सराफ यांचे उपस्थितीत पार पडला,यावेळी अशोक थोरात यांनी सांगितले की जायंट्स ही सामाजिक सेवा करणारी संस्था असून या संस्थेत कोणताही व्यक्ती काम करू शकतो, संस्थेची ग्रामीण भागात सुद्धा भरभराट व्हावी याचा संकल्प नाना चुडासामा यांनी केला होता त्यांच्या निधनानंतर त्यानी पाहिलेले स्वप्न पूर्ण केल्यास त्यांना खºया अथार्ने श्रद्धांजली मिळेल,असे सांगत शेतकरी व दुर्गम भागात काम करणारी व्यक्ती सुद्धा या संघटनेत काम करू शकते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाम गुजर,अनिल जैन,अमित सराफ,राजकुमार भन्साळी, अरुण कायस्थ, सुरेश मल्लावत, राजेश तायडे, संदीप जंभोरकर, सन्मती जैन, पुरुषोत्तम धन्नवत, राजेश खडकपूरकर, जुगलकिशोर हरकूट, संचित धनांवत यांनी परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment