देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)
लोकशाही पंधरवाडा व शहर समृद्धी उत्सवा निमित्त नगर परिषदेच्या वतीने शहरातून प्रभात फेरीचे आयोजन
शासनाच्या निदेर्शानुसार नगर परिषद स्तरावर दिनांक २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवाडा साजरा करणे तसेच दिनांक १ नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शहर समृद्धी उत्सव साजरा करणे या सबबीखाली शासनाच्या विविध योजना व उपक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभात फेरी च्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्याकरिता नगर परिषदेच्या वतीने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक नऊ वाजता नगराध्यक्षा सौ सुनीता रामदास शिंदे, उपनगराध्यक्ष प्रवीण झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व न.प.चे सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी प्राध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा यांच्या श्री शिवाजी हायस्कूल बँड पथक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण शहरांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक बंदी तसेच शासनाच्या इतर योजना बाबत लाऊड स्पीकर द्वारे घोषणा करून जनजागृतीचे काम केले तर विद्यार्थिनींनी रॅलीच्या रूटवर संपूर्ण शहरांमध्ये जनजागृती संदभार्तील पोम्प्लेट चे वितरण केले त्या अनुषंगाने शहरातील सर्व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आव्हान नगराध्यक्ष यांनी केले नगर परिषद कार्यालयाच्या रांगणा मधून प्रभात फेरीला सुरुवात झाली त्यानंतर बस स्टॅन्ड चौक, बाबासाहेब आंबेडकर, शनिवार पेठ, महाद्वार चौक, जुनी न. प. कमिटी चौक, संतोष चित्रमंदिर त्यानंतर पुन्हा बस स्टँड चौक व समारोप नगरपरिषद कार्यालय प्रांगणात करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जी बी डोईफोडे यांनी केले. याप्रसंगी नगर पालिका सदस्य व इतर पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी महिला बचत गटाच्या महिला श्री व्यंकटेश महाविद्यालय व न्यू श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक - शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर पालिका कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment