९२ गावांच्या ग्रीन योजनेचे खोदकाम थांबवा
खºया अर्थाने धरणग्रस्तांसाठी सर्व पक्षीय आंदोलन
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसापासून संत चोखा सागार खडकपूर्णा प्रकल्पातील पाण्यासाठी रणकंदण सुरु आहे. मराठवाड्यातील जालना शहरासह ९२ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रीन योजनेचे खोदकाम तत्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी सिंदखेड राजा मतदार संघातील सर्व पक्षीय व धरणग्रस्त परिसरातील शेतकºयांच्या वतीने दि.५ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील देऊळगावमही येथील डिग्रस चौकात नागपूर पूणे महामार्ग बंद करुन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून पाणी कोणाच्या बापाचे नाही आमच्या हक्काचे आहे या गर्जनेने महामार्ग दनाणून गेला.
मराठवाडा आणि विदर्भ मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत पाणी प्रश्न पेटल्याने धरणग्रस्तासाठी रस्त्यावर सर्व पक्षीय नेत्यांनी दंड थोपटले आहे. पहिल्या लढाया स्वातंत्रसाठी होत्या आता हा लढाया पाण्यासाठी होत आहे. तर या लढाया पांढºया कपडे घालणाºया नेत्या विरोघात आहे. आज लढायांचे फक्त स्वरुप बदललेला असल्याने तलवारीच्या जागी बंदुका आल्या आणि आता बंदुकाच्या जागी आंदोलना सारखे शास्त्र आले. याच्या पलीकडे काहीच राहिलेला नाही म्हणून संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याची लढाई अस्मितेची आहे. म्हणून बबनराव लोणीकर यांनी पाण्यासाठी हा राजकारण करु नये अन्यथा तुम्हाला घरा बाहेर फिरू देणार नाही असा इशारा स्वभिमानीचे रविकांत तुपकर यांनी दिले. सिंदखेड राजा मतदार संघातील सर्व पक्षीय व धरणग्रस्त परिसरातील शेतकºयांच्या वतीने दि.५ फेब्रुवारी रोजी देऊळगावमही येथील डिग्रस चौकात नागपूर पूणे महामार्ग बंद करुन चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सिंदखेड राजा व देऊळगावराजा हे दोन तालुके पूर्वी पासून पाणी टंचाईग्रस्त आहे. पाच वर्षा पूर्वी खडकपूर्णा धरण पूर्णत्वास आले असता या दोन तालुक्यासह मतदार संघातील हिरवे स्वप्न पाहणाºया शेतकºयांवर महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ९२ गावाची पाणी पुरवठा योजना आणून या सर्व शेतकºयाचे स्वप्न पुन्हा दुष्काळात लोटले आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रीन योजनेचे खोदकाम तात्काळ बंद करण्यात यावे, तसेच अनिधिकृत बांधकाम बंद करावे, कोणतीच मंजुरात नाही, विहिरीत सुरु असलेल्या ब्लासटिंग मुळे धरणाला तडे जात असल्याने भविष्यात धोक निर्माण होण्याची शक्यता नकराता येत नाही. कोणत्याही ग्रामपंचाती कडून नाहरकती दिलेल्या नाही, तरी मंत्री बबनराव लोणीका हे सत्तेच्या दुरपयोग करुन मातृतीर्थ जिह्यातील धरणग्रस्त शेतकºयांना नहक त्रास देण्याचे काम करीत असल्याचे जनआक्रोश नेत्यांनी केला आहे. स्वभिमानी शेतकरी संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसंग्राम संघटना, मनसे, एमआयएम, भारीप, बहुजन समाज पक्ष, अनिस, भाजप व इतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बहुसंख्यने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment