Tuesday, February 5, 2019

अवैध धंद्या विरोधात पत्रकार तिडकेचा एल्गार...



देऊळगांवराजा :  (प्रतिनिधी)
       अधिकायांच्या आशिवार्दाने अवैध व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले होते. वरली-मटका, एक्का बादशहा जुगार, बनावट दारूची अवैध वाहतूक व विक्री, रेशन धान्य व रॉकेलचा काळा बाजार, अवैध रेती वाहतूक, तितली पुठ्ठा, गुटखा विक्री व क्रि केट सट्ट्यासह एक ना अनेक अवैध व्यवसायाने तर सर्वत्र थैमान घातले असल्याची तक्रार दि.४ फेबू्रवारी रोजी मंगेश मारोती तिडके यांनी विशेष पोलिस महानिरिक्षक अमरावती यांना दिली आहे.
    देऊळगावराजा तालुक्यात विविध गावांत अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. सहजरीत्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खेडेगावात देशी दारू उपलब्ध होते. शिवाय काही गावांमध्ये गावठी दारू काढून त्याची विक्री होते. देशी व गावठी दारूच्या अवैध प्रकारामुळे मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते. राज्यात गुटखा बंदी असताना या तालुक्यातील पानटपºया, किराणा दुकानावर गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. अनेक पोलीस स्टेशन हद्दित वर्दळीच्या ठिकाणी मटका, जुगार अड्डा, तितली-भवरा अवैध व्यवसाय थाटण्यात आले आहेत. दिवसभरात कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल या धंद्यांच्या माध्यमातून होत आहे. खुलेआम चालणाºया अवैध व्यवसायाला पोलीस प्रशासनातील काही अधिकाºयांची मूकसंमती असल्याने त्यांच्यावर कार्यवाही होत नाही, अशी तक्रार दि.४ फेबू्रवारी रोजी पत्रकार मंगेश मारोती तिडके यांनी पोलिस महानिरिक्षक अमरावती यांच्या कडे केली आहे. त्यांच्या या लेखी तक्रारीची वाट्सअ‍ॅप आणि फेसबूक वर धूमाकूळ घातला आहे.  

No comments:

Post a Comment