Saturday, April 13, 2019

स्थानिक आमदारांचा लक्ष मिशन फॉर कमिश्न


सेंकडहॅन्ड गाड्यात फिरणारे, अता नविन महागड्या गड्यात फिरतात...
डॉ.शिंगणेंनी साधला आमदारावर निशाना...
खासदाराशी माझा कोणताच नाता नाही,
देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)
         राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या माणसाने सामान्यांसाठी, लोकाना न्याय देण्यासाठी, मतदार संघाचा विकासाच्या दिशेने घेवून जाण्यासाठी राजकारणात यश मिळो किंवा न मिळो... निवडणुक लढविल्या पाहिजे. हे २०१४ च्या निवडणुकीतून शिकलो. तेव्हा निवडणुक न लढविण्याची हि माझी सर्वात मोठी चूक होती. कारण आज स्थानिक आमदार जनतेची दिशाभूल करुन फक्त मिशन फॉर कमिशनचे काम करीत आहे. पाच वर्षा पूर्वी सेंकडहॅन्ड गाड्यात फिरणारे आमदार , अता नविन महागड्या गड्यात फिरतात याचे अर्थ काय तसेच खासदाराशी माझा कोणताच नाता नाही असे प्रतिपादन लोकशाही महाआघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले.
      दि.११ एप्रिल रोजी स्थानिक मदिना मार्केट समोर महाआघाडीचे प्रचार सभेत डॉ.शिंगणे बोलत होते. यावेळी स्वभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके, माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, संतोष खांडेभराड, कविश जिंतुरकर, काँग्रेसचे रमेश दादा कायंदे, मनोज कायंदे, अनिल सावजी, हाजी सिद्दीक, हाजी आलमखॉ कोटकर, डॉ.इकबाल खान कोटकर, नगरसेवक मो.रफीक, हनिफ शाह, इस्माईल बागवान, अतिष कासारे यांच्यासह महाआघाडीतील पदाधिकाºयांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ.शिंगणे म्हणाले की, १९९५ पासून मातृतीर्थ मतदार संघाने माझ्यावर प्रेम आणि आर्शिवादाची अक्षरश: उधळण केली. पण मागील निवडणुकीत मी लढलो नाही त्यामुळेच हे अपघाताने आमदार झाले. आमदारांनी मागील पाच वर्षात सभामंडप, रस्त्याचे डांबरीकरण यासह लाहन मोठ्या सर्वच कामांत एकच गोष्टीवर लक्ष ठेवल ते फक्त मिशन फॉर कमिश्न या उद्देशाने काम करीत आहे. राहेरी तिन वेळा काम, अवैध रेती व्यवसायाला हातभर लसवून जमवली माया आणि स्व:तच विकास पुरुषाची पदवी घेवून फिरतात. विकास काय असते त्यांनी आम्हाला सांगु नये असा टोला त्यांनी लागवला. सिंदखेडराजा मतदार संघातील जनतेने मला भरभरुन प्रेम दिले. त्यांच्या प्रेमातून उतराई होणे या जन्मतरी शक्य नाही त्यामुळे या मतदार संघातील जनतेला मी आयुश्यात कधीच वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच मतदारांची दिशाभूल करुन माझ्याशी नाता जोडणारे खासदाराशी माझा कोणताच नाता नाही  ज्यांना संसदेत जिल्ह्याचे प्रश्न मांडता येत नाही, अशा उमेदवाराला तेथे पाठवून फायदा काय तसेच दिल्लीतून योजना खेचून आण्यासाठी हिंदी व इंग्रजीवर कमांड पाहिजे असा टोला लावला. तर रविकांत तुपकर यांनी खासदारांनी मागील दहा वर्षात जनतेसाठी काय केले आणि दहा वर्षाचा लेखा जोखा जनतेला द्या तसेच कमिशनबाजी, हफ्तेखोरी, दादागिरी यामुळे जनता आता त्यांना त्रस्त झाल्याचा आरोप केला.  याप्रंसगी परिसरातील हजारोच्या संख्यने नागरिक उपस्थित होते.  
 
                               

No comments:

Post a Comment