सिंदखेड राजा : (प्रतिनिधी)
येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक झाल्यानंतर दि.२० एप्रिल रोजी उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी नगराध्यक्षा नंदाताई विष्णू मेहेत्रे यांची निवड करण्यात आली. त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली त्याचा संपूर्ण श्रेय नुकतेच भाजप मध्ये प्रवेश घेवून जिजाऊ नगरीत नगर पालिका निवडणुकीत भाजपाची एकमात्र जागा निवडुण आल्याने शहर भाजपा कडून तसेच शहरवासीयांच्या वतीने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू मेहत्रे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सिंदखेडराजा भाजपा शहर उपाध्यक्ष गजानन भुतेकर, भगवान मेहत्रे, गणेश खांडेभराड, डिगांबर ठाकरे, अशोक मेहत्रे, विनोद झोरे, प्रशांत पंडित, अशरफ पटेल आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment