Tuesday, April 23, 2019

राज्य पत्रकार पुरस्काराने रफिक कुरेशी सन्मानित


मेहकर : (प्रतिनिधी)
       दरवर्षीप्रमाणे मुंबई येथील पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या वषीर्चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मेहकर शहरातील लोकमतचे  पत्रकार रफिक कुरेशी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दि.२१ एप्रिल रोजी देण्यात आला आहे. 
       पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागासवर्गीय आयोग महाराष्ट्रचे सदस्य सी. एस. थुल व इतर मान्यवरांच्या हस्ते कुरेशी यांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. अशोक म्हात्रे, विजयकुमार गवई, आनंद शिंदे, सुभाष शिर्के, जगदीश दगळे, सुधीर शर्मा, डॉ. अजित गवळी, अभिनेत्री प्रतिभा पाटील, शरद वानखेडे उपस्थित होते. 
 

  

No comments:

Post a Comment