Tuesday, April 23, 2019

सर्वच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपाला त्वरित सुरुवात करावी


 
शिवसंग्रामने एसडीओंना दिले मागण्यांचे निवेदन 
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
      मागील वर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्याने पीक उत्पादन खूप कमी झाले आहे. सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे बँक प्रशासनाने लवकरात लवकर शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात करावी,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांनी दि.२३ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी अहिरे यांच्याकडे सादर केले. 
         एप्रिल महिना उलटला तरी अद्याप पीक कर्ज वितरणाबाबतच्या कोणतीही हालचाल जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली नाही. खरीप हंगाम जवळ आला असतांना अद्याप पीक कर्ज वितरणाचा प्रश्न सुटलेला नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून बँकांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्टे देण्यात आले होते. या वर्षी एप्रिल महिला संपत आला तरी अद्याप शेतकºयांना पीक कर्ज वितरणाची कारवाई सुरू झालेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासनाकडून बँक अधिकाºयांची बैठक देखील अजून घेण्यात आलेली नाही. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात अनेक शेतकरी कर्ज बाजारी झाले आहेत. मुलामुलींचे शिक्षण, लग्न आदींसाठी शेतकºयांकडे पैसे नाहीत. अशात खरिपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. या प्रश्नामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळे लवकर शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरण केले नाही तर, बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढतील. त्यामुळे प्रशासनाने शेतकºयांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून तत्काळ पीक कर्ज वितरणाचा प्रश्न सोडवावा. अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, संघटक जहीर पठाण, सुरेश निकाळजे, संतोष हिवाळे, विनायक अनपट, मदन डुरे, अजमत पठाण, ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment