
शहराच्या पाणी टंचाईला नगर पालिका प्रशासनाने दिली मात
देऊळगावराजा : प्रतिनिधी
अनेक वर्षापासून शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईसंदर्भात अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या शहराला महिन्यात एकद्याच पाणी पुरवठा असल्याची ओरड होती. तसेच शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकांती करावा लागत होती. लोकसभा निवडणुकीच्या वाºयाने शहराच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागत होते. अखेर शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पालिकेकडूुन जोरदार प्रयत्न करुन येत्या सोमवारी दि.२९ एप्रिल पासून शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे यांनी दिली.
नगर पालिका कडून शहराला जालना जिल्ह्यातील पिरकल्याण प्रकल्प, सावखेडभोई, शिराळा आणि संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्प जलवाहीनी द्वारे शहराला पाणी पुरवठा करण्यात येत होता. खर्च जास्त होत असल्याने पिरकल्यान आणि शिराळा प्रकल्पावरुन पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. सन २०१३ मध्ये सुजल निर्मल योजने अंतर्गत शहरासाठी पाईप लाईन मंजूर करण्यात आली होती. तात्कालीन नगराध्यक्षा सौ.मालती रमेश कायंदे यांच्या कार्याकाळात संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकलपातून पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली. यंदा अत्यंत कमी पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी आटल्याने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पालिका प्रशासनासमोर मोठे आवाहन होते. पाण्याची सतत समस्या असल्याने सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, नगराध्यक्षा सौ.सुनिता रामदास शिंदे यांनी वाढीव पाणी पुरवठा योजनांच्या पाठपुरव्याने ३ कोटी २५ लाख रुपये मंजुर झाल्याने कामाला सुरुवात करण्यात आली. नगर पालिका प्रशासनाकडून जॅकवेल मध्ये पाणी आण्यासाठी प्रकल्पाच्या पात्रात नाली खोदून उपाय योजना करण्यात आली. दि.२७ एप्रिल रोजी नगर पालिका प्रशासनाकडून विहिरीच्या अंतीम टप्यातील कामाची पाहणी करण्यात आली. शहवासीयांना मिळणार पाणी सोमवारी दि.२९ एप्रिल पासून जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांच्या हस्ते शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या मोटरीचे बटन दाबणार आहे. अशी माहिती नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे यांनी साप्ताहिक मातृतीर्थ एकस्प्रेसशी बोलतांना दिली. नविन पाणी पुरवठा विहिरीच्या अंतिम टप्यातील पाहणी कण्यासाठी सिंदखेडराजा मतदर संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, भाजपा नेते डॉ.गणेश मान्टे, डॉ.रामदास शिंदे, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, गटनेत्या विमलबाई माळोदे, नगरसेविका सौ.नंदा कटारे, स्विकृत नगरसेवक वसंतआप्पा खुळे, नंदन खेडेकर, अजय शिवरकर, जगदीश कापसे, मोरेश्वर मिनासे, तथा सर्व महायुतीचे नगरसेवक, शिवसैनिक , पत्रकार उपस्थित होते.


No comments:
Post a Comment