देऊळगावराजा : प्रतिनिधी
नुकतेच जेईई मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला असून यामध्ये देऊळगाव राजा शिक्षण संस्थेचे स्थानिक देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चार विद्यार्थी उच्च गुणवत्ता धारण करीत पात्र ठरले असून देऊळगावराजा शिक्षण संस्थेचा नावलौकिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वाढविला आहे.
यामध्ये जयदत्त श्रीपाद कायस्थ ९५.९५%, जयंत संतोष खांडेभराड ९२.१५% , राहुल विष्णु शिंगणे ८९.१९%, सुमित विलास दिडहाते ८३.४२% हे विद्यार्थी पात्र ठरले असून आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियोजन आणि नियमितेला देतात.
आजच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य टिकून राहावा अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते त्यामुळे आपल्या पाल्यांना शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवण्याची धडपड अनेक पालकांमध्ये दिसून येत आहे यामध्ये कोटा, पुणे, लातूर, औरंगाबाद व अकोला या शहरांची प्रमुख्याने नावे येतात याठिकाणी जाणाºया लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रचंड खर्च होतो मात्र यातील काही बोटावर मोजण्याइतकीच विद्यार्थी त्या ठिकाणी यशस्वी होतात. मागील २५ वर्षांपासून देवळगाव राजा शिक्षण संस्थेचा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीचा यशस्वी पॅटर्न असून यामुळे हजारो विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेसाठी पात्र झालेले आहेत आज ह्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी चा पॅटर्न यशस्वी असुन भविष्यातही तो कार्यरत राहावा अशी ग्रामीण भागातील पालकांकडून अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल देऊळगाव राजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक , सचिव संचालक, सदस्य व सर्व प्राध्यापक- शिक्षक वृंदानी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment