देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा जिल्हा शालेय व इतर क्रीडा स्पर्धा सन २०१९ - २० द्वारे आयोजित तालुकास्तरीय १४, १६, १९ वयोगटातील मुलांचे क्रिकेट सामने राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.
१४ वषार्तील गट सामन्यांमध्ये राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने सहकार विद्या मंदिर देऊळगाव राजा संघाला सात गडी राखून मात दिली. सहकार विद्या मंदिर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दहा षटकांत ९ बाद ६० धावा केल्या तर या धावांचा पाठलाग करताना राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल कडून कार्तिक भोसले २२, शैलेश दहातोंडे १५, ज्योतिरादित्य शेळके ८, स्वराज शिंगणे ४ धावा केल्या.याप्रसंगी शाळेच्या अध्यक्ष’ डॉ.सौ.मीनल रामप्रसाद शेळके, सचिव डॉ.रामप्रसाद रंगनाथराव शेळके, सपाटे सर व इतर मान्यवरांनी या सामन्याचा आनंद घेतला. राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचे डॉ.रामप्रसाद शेळके सरांनी तोंड भरून कौतुक केले व त्यांना जिल्हास्तरीय सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रिकेट प्रशिक्षक रामेश्वर इंगळे, राजेश पंडित, पंढरीनाथ भुतेकर, ज्ञानेश भोसले, बाळासाहेब गोजरे, उमेश इंगळे उपस्थित होते.



ही
ReplyDelete