देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हीच प्रथा कायम राखत दि.२४ आॅगस्ट रोजी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल येथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी राधा-कृष्णाच्या वेशात उपस्थित होते.
दहीहंडीचा उत्सव संपूर्ण भारतात जसे की, गोकुळ, मथुरा,वृंदावन, द्वारकापुरी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दही भंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. या उत्सवासाठी तयार केल्या जाणाºया विशिष्ट प्रसादास गोपाल काला असे म्हणतात दि.२४ आॅगस्ट रोजी गोपालकाला शाळेमध्ये तयार करण्यात आला होता. सर्वांनी या कायार्चा आनंद घेतला गोविंदा आला रे आला, हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की या जयघोषात उंच मडके दही दुधाने भरलेल्या ठेवून तेथ पर्यंत मानवी मनोºयावरून पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ खेळण्यात आला. श्रीकृष्णाने वज्र मंडळात गायीचा असतांना आपण व आपले सवंगडी सर्वांच्या शिदोºया एकत्र करून त्या खाद्यपदाथार्चा काल केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर शाळेमध्ये काला करण्यात आला व दहीहंडी फोडण्यात आली. पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर नृत्य सादर केले. याप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा डॉ. मीनल रामप्रसाद शेळके, सचिव डॉ. रामप्रसाद रंगनाथराव शेळके, शाळेचे प्राचार्य मॅथ्यूज मित्रा महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी मोलाचे योगदान दिले.



No comments:
Post a Comment