बुलडाणा : प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासात प्रथमच ‘राष्ट्रीय आधिवेशन‘ हा उल्लेख असलेले ४१ वे अधिवेशन संतनगरी शेगांव येथे १९ व २० ऑगस्ट २०१७ रोजी भव्य दिव्य प्रमाणात पार पडले होते. या अधिवेशनाचे यशस्वीतेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे व बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा सन्मान नांदेड येथील मराठी पत्रकार परिषदेच्या ४२व्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळयात स्वागताध्यक्ष खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्याहस्ते तथा जेष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत व परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा तथा अन्य पदाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत हा विशेष सन्मान समारंभपुर्वक करण्यात आला.
नांदेड येथे मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवार १७ ऑगस्ट रोजी पार पडले, त्यावेळी हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी परिषदेच्यावतीने विशेष स्मृतीचिन्ह देऊन राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील, अजय बिलारी, अरूण जैन, नितीन शिरसाट, अमर राऊत, सिद्धार्थ आराख आदीचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सभागृहात जेष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांच्यासह देऊळगांवराजा पत्रकार संघ यांच्यासह मातृतिर्थ पत्रकार संघ देऊळगावराजाच्या आद्यक्षा सुष्मा राऊत, सल्लागार अशरफ पटेल व सचिव प्रशांत पंडीत, देऊळगावराजा तालुका पत्रकार संघाचे अशोक जोशी, सुरज गुप्ता, मुशीरखान कोटकर, गजानन घुगे, संतोष जाधव, अमोल बोबडे, मुबारक शहा, संतोष वासुुंबे, दत्ता हांडे व मंगेश तिडके, सिंदखेडराजा तालुका पत्रकार संघाचे भगवान नागरे, रमेश कोंडाने, विठ्ठल देशमुख, अशोक गुंजाळ, अरुण तौर, भगवान देशमुख, भगवान कारभारी नागरे, सचिनराजे जाधव व अशोक सोनुने यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सन्मानचिन्ह स्विकारताच ‘श्री संत गजानन महाराज की जय’ असा गजर मंचावरून सभागृहात झाला.




No comments:
Post a Comment