Saturday, August 31, 2019

लघू औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा व नागरी सुविधेस ५ कोटीच्या कामांना मंजुरात



 आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश...
 देऊळगावराजा : प्रतिनिधी 
          दि.२७ आॅगस्ट रोजी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांने देऊळगावराजा येथील लघू उद्योगिक क्षेत्राकरीता नागरी सुविधेबाबत स्वतंत्र उच्चस्तरीय सभा बोलविण्यात आली होती. या सभेमध्ये महत्वाचे पाणी पुरवठा तसेच सर्विस रोड, अंतर्गत रस्ते, बस थांबा, हायमॉस लॅम्प, पथदिवे, इत्यादी कामांसाठी ५ कोटीच्या कामांना मंजुरात देण्यात आली. अखेर  आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहें.
       गेल्या अनेक वर्षापासून पाणी पुरवठा तसेच सर्विस रोड, अंतर्गत रस्ते, बस थांबा, हायमॉस लॅम्प, पथदिवे इत्यादी अनेक कामे रेंगाळलेली होती. या करिता देऊळगावराजा नगरीचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते अनिल सावजी यांनी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्याकडे सतत पाठपूरावा करुन आमदाराच्या माध्यमातून दि.२७ आॅगस्ट रोजी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वरील सर्व मुद्दे आमदार यांनी लावून धरल्यामुळे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सर्व कामास ५ कोटी रुपयेची मंजूरात देवून ही कामे त्वरीत होण्याबाबत संबंधिताना आदेश दिले. याप्रसंगी लघू औद्योगिकचे डिप्युटी सिय.ई.ओ. पवार, आर.ओ.फुके, अधिक्षक अभियंता बनसोड, कार्यकारी अभियंता डाबेराव, जिवन प्राधिकारणाचे उप अभियंता शंकर भिसे, पत्रकार ुसुनिल मतकर व उद्योग समुहातर्फे काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते अनिल सावजी उपस्थित होते. यावेळी उद्योग समुहातर्फे सावजी यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई  सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर व संबंधित सर्व अधिकाºयांचे आभार व्यक्त केले.   

1 comment: