Saturday, August 31, 2019

जायंट्स चे सन्मती जैन व डॉ.अशोक काबरा नेत्रदान प्रोत्साहक म्हणून सन्मानित


मरणोत्तर नेत्रदान चळवळ अधिक गतिमान झाल्यास भारतातील अंध व्यक्तीची संख्या झपाटयाने कमी होईल 
 देऊळगावराजा : प्रतिनिधी
       संपूर्ण भारतात आज मित्तिस १.१ मिलियन (११ लक्ष) जनता कॉर्नियल मुळे अंध असून मरणोत्तर नेत्रदात्यांची संख्या अगदी तोकडी असून दरवर्षी २५ हजार अंध व्यक्तीची यात भर पडत असून सध्य स्थितीत दरवर्षी ४३ हजार आय बॉल डोनेट होत आहे असेच सुरू राहिल्यास हे पूर्ण करण्यासाठी ११२ वर्ष लागतील अशी माहिती गणपती नेत्रालयाच्या वतीने देण्यात आली असून यावर्षी नेत्रदान पंधरवाडा हा दि.२५ आॅगस्ट ते ८ स्पटेंबर  या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या निमित्त दि.२९ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात नेत्रदान प्रोत्साहकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये गेल्या २५ वषार्पासून देऊळगावराजा जायंट्स ग्रुप चे माजी अध्यक्ष सन्मती जैन, व डॉ.अशोक काबरा हे शहरात मरणोत्तर नेत्रदान चळवळ राबवित असून आतापर्यंत २०६ जणांचे नेत्रदान करून घेण्यात आले आहे. यामुळे जवळपास ४०० अंध नागरिकांना दृष्टी येऊन ते आज हे सुंदर जग बघत आहेत, या दोन्ही माजी अध्यक्ष यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला,
         याबाबत सविस्तर असे की भारतात अंध व्यक्तीचें प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे भारतामध्ये नेत्रदान करण्यामध्ये नागरिक पुढे येत नाही किंबहुना अनेकांना या दानाचे महत्त्व माहीत नाही त्यामुळे अंधाना दृष्टी देण्याकरिता मरणोत्तर नेत्रदान चळवळ अधिक गतिमान करावी लागणार आहे.कारण आज मित्तिस भारतात १.१ मिलियन (११ लक्ष नागरिक) कॉर्नियल मुळे अंध आहेत तर दरवर्षी २५ हजार नागरिक या यादीत समाविष्ट होत आहेत, केवळ दरवर्षी ४३ हजार नेत्रदान होत आहेत. हा आकडा फार तोकडा असून असेच सुरू राहिल्यास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ११२ वर्ष लागतील त्यामुळे किमान दरवर्षी २ लाख नेत्रदान झाल्यास यामध्ये फरक पडेल अशी माहिती गणपती नेत्रालयाच्या या विभागाच्या प्रमुख डॉ.नम्रता काबरा यांनी दिली,कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील डॉ.मेमोरियल ट्रस्ट चे संचालक शशिकांत धामणे उपस्थित होते तर गणपती नेत्रालयाचे राजकुमार बारवाले, मुंदडा, डॉ.नायगावकर उपस्थित होते. या नेत्रदान पंधरवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या २५ वर्षांपासून या ठिकाणी होत असतात या कार्यक्रमात ज्यांनी नेत्रदान केले त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचा सन्मान व नेत्रदान करण्याकरिता प्रोत्साहित केले अश्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो, देऊळगाव राजा जायंट्स ग्रुप च्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून मरणोत्तर नेत्रदान चळवळ राबविण्यात येत आहे, त्यांच्या कायार्ची दखल घेत सन्मती जैन व डॉ.अशोक काबरा यांना नेत्रदान प्रोत्साहक म्हणून सन्मानीत करण्यात आले, गेल्या वर्षी गणपती नेत्रालयाच्या टीमने ५५० अंध व्यक्तीना दृष्टी देण्याचे महान कार्य केले आहे, सध्य स्थितीत ११९ अंध व्यक्ती प्रतीक्षेत आहेत, १९९३ ते २०१९ या कालावधीत ६९५० आय बॉल जमा करण्यात आले त्यांपैकी ३१३९ आय बॉल अंध रुग्णांना बसविण्यात आले तर उर्वरित आय बॉल इतर ठिकाणी वापरण्यात आले, जालना, अकोला, देऊळगाव राजा, पुसद, लातूर, परभणी, वाशिम, बुलढाणा, बीड, यवतमाळ, मलकापूर, येथून नेत्रदात्याकडून आय बोल प्राप्त होतात.

 










 

 
     

No comments:

Post a Comment