देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यायात राष्ट्रीय एकात्मतेसाठी विवेक जागर अभियानांतर्गत ख्यातनाम प्राच्यविद्यापंडित, साहित्यिक व विचारवंत मा. डॉ.आ.ह.साळुंखे यांचा लेखणीची मशाल करून समाज प्रकाशाभिमुख करण्यासाठी दिलेल्या योगदानाप्रीत्यर्थ सन्मान व जाहीर व्याख्यान समारोह प्रसंगी आ. डॉ.आ.ह. साळुंखे सरांनी वरील उद्गार काढले.
आपल्या मार्गदर्शनादरम्यान त्यांनी, मनुष्याने आपल्या जीवनात कोणताही निर्णय डोळस व सजगपणे घेतला पाहजे हे पटवून देण्यासाठी व्यक्तीच्या अंगी फूलं आणि काटे यापैकी फूलं निवडण्याची सजगता असावी हे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनादरम्यान त्यांनी समाजमाध्यमांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले. समाजमाध्यमांतून आपल्यापर्यंत येणारी सर्वच माहिती सत्य असतेच असे नाही. तेव्हा कोणत्याही माहितीची सत्यता पडताळण्यासाठी मनुष्याने बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकाच्या कसोटीवर ती तपासली पाहिजे. प्रत्येक विद्याथ्यार्ने आपली कुवत व क्षमता ओळखून आपल्या क्षेत्राची निवड करणे आवश्यक असते. समाजोपयोगी कौशल्ये व ज्ञान निर्मितीची क्षमता विकसित केल्यास प्रत्येकाला असीमित संधी उपलब्ध होऊ शकतात, असे ते म्हणाले. आपल्या मार्गदर्शनादरम्यान त्यांनी एरीक फ्रॉन, अॅरिस्टॉटल, प्लेटो, गॅलिलिओ, न्यूटन यासारख्या विविध शास्त्रज्ञांच्या सिद्धांतांचे दाखले देत मानवी जीवनात अनुभवप्रामाण्यवादाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. मनुष्याने जीवन जगात असताना आपले स्वातंत्र्य जोपासून इतरांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल असे वर्तन करू नये. तसेच भारताची अखंडता व एकात्मता टिकविण्यासाठी आजच्या तरुण पिढीने जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन मानवतावादाचा पुरस्कार करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान डॉ. आ. ह. साळुंखे विचार प्रचार समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक मा. प्रा. अर्जुन जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनादर्शनातून विद्यर्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता व अखंडता अबाधित राखण्यासाठी महापुरुषांच्या चरित्रांचा आदर्श घेण्याने आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आ.प्राचार्य डॉ.गजानन जाधव यांनी डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या विचार-कायार्चे महत्व आजच्या पिढीला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात उपलब्ध डॉ. आ. ह. साळुंखे समग्र वाङ्मय वाचनाचे आवाहन केले. प्रा. शाम मुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर प्रा. मधुकर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी राजे शिवाजीराव जाधव, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेशजी कायंदे, प्रा.कमलेश खिल्लारे, पत्रकार मुशीरखान कोटकर, सेवानिवृत्त बँक अधिकारी एकनाथ खेडेकर, प्राचार्य टेकाळे यांचेसह बहुसंख्यने विद्यार्थी तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment