Thursday, August 15, 2019

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 
 देऊळगावराजा : (प्रतिनिधी)            
             स्थानिक  राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि.१५ आॅगस्ट रोजी भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन शाळेमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला . मुलांनी विविध नृत्य, नाटिका, भाषण व देशभक्तीपर गीत इत्यादींच्या माध्यमातून त्यांना देशाप्रती असलेली निष्ठा सिद्ध केली. पूर्व प्राथमिक विभागाच्या छोट्या मुलांनी भारत हा विविधतेतून कसा एकसंघ झाला आहे, हे गाण्यातून दाखवून दिले. कारगिल विजयाचा व परिणामांचा तो प्रसंग डोळ्यांत अश्रू अनावर करणाराच होता. मुलांनी सादर केलेल्या कार्यक्रमांसाठी सर्व पालक,शिक्षक, श्रोते यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव झाला. 
         भारताचा ध्वज असा स्वातंत्र्य फडकवण्यासाठी थोर महात्मे यांनी स्वत:च्या जीवनाचे केलेले बलिदान आणि त्या हुतात्म्यांच्या बलिदानचा आजचा परिणाम, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यामधील फरक, पारतंत्र्यात असताना केलेले प्रयत्न आणि त्यांना मिळालेले यश व स्वातंत्र्य मिळाल्यावर होत असलेल्या चुका आणि त्या चुका सुधारण्यासाठी होत असणारे प्रयत्न व त्यांना मिळणारे अपयश या वास्तववादी  यशापयशाचा सिद्धांत मुलांनी विविध माध्यमातून सर्वांसमोर मांडला. सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी शाळेचे उपाध्यक्ष विष्णूजी शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी रंगनाथजी शेळके, अध्यक्षा डॉ.सौ.मीनल शेळके, सचिव डॉ.रामप्रसाद शेळके, काळे गुरुजी, सभापती कल्याणी शिंगणे, राजु शिरसाट, गजेंद्र शिंगणे, सौ.पल्लवी ताठे, सौ.गंगा गायकवाड, किशोर पटेल, श्याम गुजर, अक्षय वायाळ, वैभव मिनासे, सुनील कांबळे, राजकुमार चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णूजी शेळके होते. यांनी भाषणातून स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली दिली व आजच्या स्वातंत्र्य भारतासमोर लोकसंख्या,भ्रष्टाचार,प्रदूषण  इत्यादी गंभीर प्रश्नांची निर्मिती कशी झाली? व या प्रश्नांच्या निवारणासाठी काय केले पाहिजे? याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रामप्रसाद शेळके सरांनी केले. त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे स्वातंत्र्य सदोदित टिकून ठेवण्यासाठी मुलांना मार्गदर्शन केले व याचबरोबर मुलांचा अध्ययन-अध्यापन स्तर उंचाविणे, त्यांचा सर्वांगीण विकास, मुलांचे निरोगी आरोग्यासाठी शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम, क्रीडा विभागाकडून मुलांना दिल्या जाणारे विशेष प्रशिक्षण, सुरक्षित बस सेवा, उच्चशिक्षित तज्ञ व अनुभवी शिक्षक आणि ज्ञानदानाचे त्यांचे पवित्र कार्य या सर्वांमधून तावून निघालेला प्रत्येक विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी न बनता तो देशाचा सबल शिक्षा विभूषित नागरिक होण्यासाठीच शाळेमधून बाहेर पडेल याची ग्वाही दिली. शाळेचे प्राचार्य मॅथ्यूज मित्रा सरांनी मुलांना स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो व त्यामुळे देशाप्रती आपली भक्ती कशी वृद्धिंगत होते, याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित घोरपडे व  फैजल उस्मानी यांनी केले तर आभार प्रदर्शन मॅथ्यूज सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

         
 



     
 




 

 
     

No comments:

Post a Comment