Thursday, August 15, 2019

राष्ट्रीय समाज पक्षाचा २५ आॅगस्टला मुंबईत मेळावा



जिल्ह्यातून जाणार हजारो कार्यकर्ते:  सुनील मतकर  
 देऊळगावराजा : (प्रतिनिधी)            
           राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई येथे शिवाजी पार्कवर दि.२५ आॅगस्ट रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्याला बुलडाणा जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
      या मेळाव्याला मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष अक्कीसागर, ग्रामविकासमंत्री ना. पंकजा मुंडे, राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. देशातील उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी बसविण्यासाठी व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आणि देशात मोठी चळवळ निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना महादेव जानकर यांनी चौंडी येथे केली. यापूर्वी सत्तेवर असणाºया पक्षांनी धनगर समाजाच्या आरक्षणाकडे कानाडोळा केला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ना. महादेव जानकर यांनी राज्यात रान उठवलं. याच संधीचा फायदा घेत भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. यासाठी भाजप सरकारला वेळोवेळी जाब विचारण्यात आला. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक योजना समाजाच्या पदरात पाडून घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत, गजानन गारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती सुनील मतकर यांनी दिली.. 
         
 



     
 




 

 
     

No comments:

Post a Comment