Wednesday, November 27, 2019

टिपू सुलतान हे कुशल सेनापती होते

टिपू सुलतान जयंतीदिनी तहसिलदार सारीका भगत यांचे प्रतिपादन 
टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
देऊळगावराज : प्रतिनिधी
         टिपू सुलतान हे एक विद्वान व कुशल सेनापती होते. तहसिलदार सारीका भगत यांचे प्रतिपादन यांनी आयोजित टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. 


       शेर ए हिंद टिपू सुलतान यांची जयंती दि.२० नोव्हेंबर रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने टिपू सुलतान जयंतीनिमित्त दि.२६ नोव्हेंबर रोजी गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसिलदार सारीका भगत, जि.प.सदस्य मनोज कायंदे, संतोष खांडेभराड, हनिफ शाह, सलीम पठाण, मो.रफीक, नवनाथ गोमधरे, हाजी सिद्धिक, अ.हफीज, अमोल काकड, सतिष मोरे, पत्रकार सुषमा राऊत, हाजी अलताफ कोटकर, मुशीर खान कोटकर, अशरफ पटेल, टिपू सुलतान युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष शाकीर लाला, मोहसीन खान आदी उपस्थित होते. शहरातील न.प.मराठी प्रथामिक शाळा क्र.२, न.प.उर्दु प्रथामिक शाळा, आमेना अजिज उर्दु हायस्कुल, न.प.प्रथामिक शाळा क्र.१, गुलशन ए मरीयम उर्दु हायस्कुल, म्यु.श्री शिवसजी हायस्कुल, दिनदयाल विद्यालय, देऊळगावराजा हायस्कुल, कमला नेहरु हायस्कुल आदी शाळेत   तहसीलदार सारीका भगत यांच्या हस्ते स्कुल बॅग, वाटर बॅग, कॉम्पास बॉक्स, नोट बुक, पेन आदी वाटप करण्यात आले. पुढे बोलतांना सारीका भगत म्हणाल्या की, कोणत्याही कलेचे शिक्षण हे पाठ्यपुस्तकाच्या शिक्षणाला पूरकच ठरणारे असते. परंतु विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात व गरजु विद्यार्थ्यांना मदद देण्याचे काम असे संघटनाने पुढे येवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे उपक्रम राबविण्यासाठी टिपू सुलतान युवा मंचच्या अध्यक्ष व सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिपू सुलतान युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष शाकीर लाला यांनी संघटनेच्या वतीने सतत सात वर्षा पासून गरजु विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्य वाटप करण्याचे उद्देयश उपस्थितांना सांगितले. या प्रसंगी टिपू सुलतान युवा मंचाचे शाकीर लाला, मोहसीन खान, शेख अमिन,   अजमत खान, कौसर मिर्झा, अहेमद खान, मो.नासेर, शे.जुनेद, हारुन शाह, समीर खान, जुबेर खान, मो.तारीक, इकबाल भंडारी, शेख सिराज, अनवर खान, शेख महेबुब, शुख सलीम, रिजवान कोटकर, अजीम पठाण आदी उपस्थित होते.    





       

 














2 comments: