Sunday, December 29, 2019

शासकीय कार्यालयात लावलेले ते फलक काढा



कायद्याची भीती दाखवून कर्मचाऱ्याकडून नागरिकांना अप्रत्येक्ष   दम 

देऊळगाव राजा : प्रतिनिधी
        'सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी अजामीनपात्र गुन्हा पाच वर्षाची शिक्षा व दंड' असे फलक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले असून शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसताना सरकारी कार्यालयीन प्रमुख अधिकाऱ्यांकडून नागरिकांना एक प्रकारे दम देऊन त्यांचे नागरी अधिकारावर घाला घालण्यात येत असल्याचा आरोप करीत सदर फलक तात्काळ काढून घेण्यात यावे अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा अखिल भारतीय सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात यांनी एका निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे. 

      सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की शासनाचे कोणतेही आदेश नसताना शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर भारतीय दंड विधान  अंतर्गत  शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे  अजामीनपात्र गुन्हा आहे  सदर  गुन्ह्या नुसार  पाच वर्षाची शिक्षा  व दंडाचे प्रावधान  असल्याची सूचना  वजा धमकी प्रत्येक शासकीय कार्यालयात आढळून येत आहे अशा प्रकारचे फलक लावण्याचे आदेश शासनाने दिले नसताना नागरिकांच्या मनात भीती निर्माण करून नियमानुसार ासकीय अधिकार्‍याकडून कामे करून घेण्याच्या सामान्य नागरिकांच्या अधिकारावर घाला घालण्यात येत असल्याचा आरोप श्री खरात यांनी सदर निवेदनाद्वारे केला आहे पुढे त्यांनी नमूद केले आहे की कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची कामे लालफित शाहीत अडकतात परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो विहित मुदतीच्या आत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामे करून दिल्यास  शासकीय कार्यालयात लावलेल्या बोर्डावर नमूद केलेल्या ३५३ कलमाला साजेसे वर्तन करण्याचे काम नागरिकांना पडत नाही विहित मुदतीच्या आत कामे झाल्यास नागरीकांना शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाही आणि नागरिकांचा संताप अनावर ही होणार नाही दरम्यान नागरिकांना आपल्या लोकसेवकांशी संपर्क करताना बोलताना अथवा दप्तर दिरंगाईमुळे प्रलंबित प्रकरणा बाबत आयपीसी कलमाचा धाक दाखविणे लोक सेवकांना अशोभनीय आहे तसेच हा सामान्य नागरिकांच्या हक्कावर घाला आहे म्हणून शासकीय कार्यालयात लावण्यात आलेले दमबाजी चे बोर्ड तात्काळ हटविण्यास संदर्भात कारवाई व्हावी अशी मागणी श्री खरात यांनी केली आहे.

         शासकीय कार्यालयात लावण्यात येणारे सदर फलक  नोकरशाही ला बळकटी देणारे असून सदर कायद्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे आपली कामे करून घेण्यासाठी सरकारी कार्यालयांची पायपीट करणाऱ्या सामान्य नागरिकास हा फलक पाहून धडकी भरते शासकीय नोकरदार वर्गाच्या अरेरावीला संरक्षण देणारे  कवच ठरत असलेले असे फलक काढण्यात यावे
             - हाजी अल्ताफ कोटकर, सामाजिक कार्यकर्ते देऊळगाव राजा

No comments:

Post a Comment