एसबीआयची बंद शाखा पूर्ववत सुरू करण्याची मागणी;ग्राहकांचा मिळाला पाठींबा
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
चिखली रोड स्थित बँक ऑफ इंडिया बँकेची स्थानिक शाखा मागील एक महिन्या पासून कोणतीही पूर्व सूचना न देता बंद करण्यात आली आहे.बँक ग्राहकांची प्रचंड तारांबळ उडाली असल्याने असंख्य ग्राहकांची होणारी गैरसोय पाहता सदर शाखा पूर्ववत सुरू करण्यासाठी आज दि.३० रोजी बँकेच्या पायऱ्यावर शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जहीर पठाण यांच्या नेतृत्वात शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शिट्टी बजाव आंदोलन करून बँक अधिकाऱ्यांना किर्र करून सोडले.
स्थानिक चिखली रोड वरील एसबीआय बँकेची शाखा कनेक्टिव्हिटी तांत्रिक अडीचन दाखवून गत एक महिन्यापासून बंद करण्यात आली आहे.सदर बँकेच्या खातेधारकांचे व्यवहार सद्या सुरू असलेल्या बाळाजी मंदिर रोड वरील शाखेत सुरू करण्यात आले असून दोन्ही शाखेचे हजारो खातेदार एकाच बँकेतून व्यवहार करीत असल्याने या शाखेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे.परिणामी ग्राहकांना कोणताही आर्थिक व्यवहार सुरळीतपने करता येत नाही.यासंदर्भात शिवसंग्राम संघटनेने आज एसबीआय बँकेच्या बालाजी मंदिर रोड शाखेच्या पायऱ्यावर शिट्टी बजाओ आंदोलन करून सुमारे दोन तास बँकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरले.दरम्यान शाखा व्यवस्थापक विवेक सिह व अभय टीचकुळे यांनी एसबीआय चिप मॅनेजर बुलढाणा संतोष निकम यांच्याशी फोन वर चर्चा करून येत्या तीस दिवसात बंद केलेली शाखा सुरू करू असे अस्वासन आंदोलन कर्त्यांना दिले.लेखी अस्वासन मिळाल्याने शिवसंग्राम संघटनेने शिट्टी बजाव आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,तालुका संघटक जहीर पठाण,अजमत पठाण,संतोष हिवाळे,आदी कार्यकर्त्यांसह बँकेचे ग्राहक सहभाग झाले होते .तसेच सदर शिवसंग्रामच्या शिट्टी बजाओ आंदोलनास भाजपचे डॉ.गणेश मांटे,राजू टाकळकर,प्रवीण धनांवत,व्यापारी असोशियसनचे मनीष काबरा,रासपचे अमोल काकड यांनी पाठींबा दिला.


No comments:
Post a Comment