देऊळगावराजा : प्रतिनिधी
खरीप हंगाम २०१९- २० मध्ये पीक विम्याचा भरणा केलेल्या आणि पिकांच्या नुसकानीचे पंचनामे सादर केलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष सतिष विष्णू मोरे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये आपले शेतात पेरणी केलेल्या सोयाबीन, मका, कपाशी यासह अन्य पिकांच्या पिक विम्याचा हप्ता अग्रीकल्चर इन्शुरन्स पीक विमा कंपनी कडे भरलेला आहे. खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मका, कपाशी यासह अन्य पिकांची मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. तसेच कृषी विभाग आणि पिक विमा कंपनीच्या अवहनानंतर सदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी नुसकान झालेल्या पिकांच्या फोटोसह पीक विमा मागणीचे अर्ज कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे सादर केलेले आहे. सदर पीकविमा धारक नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून अद्यापपर्यंत पिकविम्याच्या हप्त्याचा परतावा देण्यात आलेला नाही. हा एकप्रकारे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे. तरी आपण सदर प्रकरणात लक्ष घालून पीक विम्याचा भरणा केलेल्या नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीने तात्काळ नुसकान देण्याचे आदेशीत करावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर दि.२४-१-२०२० रोजी लोकशाही मार्गाने शिट्टी बजाव आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.


No comments:
Post a Comment