Thursday, January 16, 2020

लोकसेवकांवर कर्तव्य बजावण्यासाठी वचक बसवावा : अन्यथा आंदोलन


 चंद्रकांत खरात यांची लक्ष वेधणारी तक्रार
शासन निर्णयाची पायमल्ली, 
हालचाल रजिस्टर कडे प्रशासनाचे दुर्लक्ष
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
     शासकीय यंत्रणेमध्ये सर्वसामान्य तथा नागरिकांचे अनेक कामे करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष संबंधित कार्यालयांमध्ये जावे लागते मात्र अशावेळी संबंधित कार्यालयांमध्ये असलेले लोकसेवक तसेच अधिकारी यांनी आपले कर्तव्य बजावून नागरिकांना सहकार्य करावे यासाठी खरात यांनी तक्रार दाखल केलेली आहे. 
      अमरावती विभागाचे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे चंद्रकांत खरात महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त व समाजसेवक यांनी लेखी स्वरूपात तक्रार करून विविध कार्यालयांमध्ये सर्वसामान्य जनतेचे होणारी ससेहोलपट थांबावी तर यासाठी २०१६ च्या शासन परिपत्रकानुसार रचना व कार्य प्रणाली नुसार प्रत्येक लोक सेवकाने आपले कर्तव्य चोख बजावून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा याबाबत खरात यांनी अमरावती आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये प्रत्येक कार्यालयाशी संबंधित मुद्दा म्हणजे हालचाल रजिस्टर ची असलेली अनियमितता यावर लक्ष वेधलेले आहे, अनेक शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी तथा लोकसेवक विविध कारणे सांगून साहेब मिटींगला गेलेले आहेत कर्मचारी नाहीत लोकसेवक सुट्टीवर आहेत अशी कारणे सांगून नागरिकांची कामे करण्यास टाळाटाळ करण्यात येते यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा व्यर्थ जातो शासकीय कार्यालयांमध्ये सेवा बजावत असताना लोकसेवक हे पूर्णवेळ काम करीत नाहीत याचबरोबर शासकीय कर्मचारी यांचे ओळखपत्र नागरिकांना दर्शनी भागावर दिसेल असेच लावून काम करावे असा नियम असताना याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांची उदासीनता पहावयास मिळते प्रत्येक कार्यालयामध्ये तक्रार पुस्तिका दर्शनी भागावर लावून नागरिकांना दिसतील अशा ठिकाणी असाव्यात याची अंमलबजावणी वतन नाही याचबरोबर प्रत्येक कार्यालयांमध्ये हालचाल रजिस्टर ठेवणे हे शासन निर्णयानुसार अनिवार्य असले तरी या रजिस्टर बाबत बरेचसे नागरिक अनभिज्ञ आहेत प्रत्येक लोक सेवकाने नागरिकांशी सौजन्य पूर्वक वागणूक द्यावी शासनाच्या नियमानुसार विविध योजना व माहिती नागरिकांना सोप्या शब्दांमध्ये समजेल अशा प्रकारचे फलक लावण्यात यावेत. अशा अनेक उणिवा विविध शासकीय कार्यालयांमध्ये पहावयास मिळतात याकडे प्रशासनाने सध्या लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून याबाबत विभागीय आयुक्त अमरावती यांनी लक्ष देऊन शासकीय यंत्रणेत बदल असलेल्या उनिवा तातडीने सोडवाव्यात अशी मागणी करत चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी आपली लेखी तक्रार विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली असून याबाबत तातडीने उपायोजना न झाल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खरात यांनी दिली आहे.


1 comment: