२ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे होणार पुरस्कार सोहळा
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक दिव्य मराठीच्या निर्भिड निपक्ष पत्रकार आदरणीय सुषमाताई राऊत यांना स्व. डॉ. जगदीश बिडवई स्मृति प्रीत्यर्थ संजीवनी दर्पण पुरस्कार २०२० दि. २९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा दि.२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता राजूरकर मंगल कार्यालय डोणगाव येथे मान्यवारांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
दि.२ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथील संजीवनी सेवा परिवार च्या वतीने पुरस्कार सोहळाचे आयोजण करण्यात आले आहे. कार्यमाच्या अध्यक्ष स्थानी रमेश काका सावजी (प्रगतशील शेतकरी) तर सत्कारमूर्ती म्हणून डॉ.शाम गाभने (उपाद्यक्ष जि. प.वाशीम), रियाज खान पठाण (जि. प.सभापती), राजेंद्र पळसकर (जि. प.सभापती), निंबाजी पांडव(प.स.सभापती), डॉ. गणेश गायकवाड (सुप्रसिद्ध साहित्यिक), सौ.उषाताई खोडके (सरपंच डोणगाव), तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दीपक पवार ठाणेदार, नाझीम कुरेशी, मधुकर घिरके, प्रमोद देशमुख, गजानन चनेवार, मो.यासीन यांच्या उपस्थितत होणार आहे. स्व. डॉ. जगदीश बिडवई स्मृति प्रीत्यर्थ संजीवनी दर्पण पुरस्कार २०२० पुरस्कारा साठी संतोष थोरहाते सकाळ, सय्यद जाबीर जानेफळ टाइम्स, सुषमा राऊत दिव्य मराठी, देविदास खनपटे, स्व. माधवराव उल्हामाले स्मृति प्रीत्यर्थ असामान्य व्यक्तीचा सत्कार हाजी अनवर खान पठाण, विलासमामा पळसकर, सुनील बोराळकर, सागर कडभणे, गणेश महाराज पांडव, वसीम खान यांना दि.२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता राजूरकर मंगल कार्यालय डोणगाव येथे मान्यवारांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.


No comments:
Post a Comment