श्री व्यंकटेश महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, ध्येयाप्रती प्रामाणिक राहावे लागते तेव्हा अपेक्षित ध्येयपूर्ती होते. यासाठी जीवनात सुरुवातीला ध्येय निश्चित करावे व ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य डाॅ. के.एस. कुळे यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित ‘पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ’ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारोहासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन जाधव उपस्थित होते. हुतात्मा दिन अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून त्यांच्या व स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ च्या परीक्षेत पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना डाॅ. के.एस. कुळे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करुन सन्मानित करण्यात आले. ठरवलेल्या ध्येयापासून आपणास विचलित करणा-या प्रवृत्तींपासून आपण सदैव दूर राहावे, त्यांना दुर्लक्षित करावे, अन्यथा यश आपल्यापासून दूर जाईल असा सल्ला डॉ. कुळे यांनी दिला. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी उत्तम पर्याय निवडण्याचे कौशल्य आपल्यामध्ये असेल तर घेतलेले निर्णय चुकत नाहीत त्यामुळे कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घ्यावा असे आवाहन त्यांनी मार्गदर्शनादरम्यान केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सदैव रोजगाराभिमुख संधीच्या शोधात असावे, असे प्रतिपादन केले. या महाविद्यालयातून पदवी उत्तीर्ण केलेला प्रत्येक विद्यार्थी हा आयुष्यात यश संपादन करेल असा आशावादही प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोपान चव्हाण यांनी केले, प्रास्ताविक व अतिथी परिचय डॉ. विनोद बन्सिले यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार प्रा. पवन कदम यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व पदवीधर विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment