जालना - औरंगाबाद रोडवरील घटना
सिंदखेड राजा : प्रतिनिधी
इगतपुरी वरून सिंदखेड राजा येथे देवदर्शन करून परत येत असतांना औरंगाबाद जवळील करमाड येथे चौघे जन ठार झाले. त्यात सिंदखेडराजा येथील ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ मेहेत्रे यांचे कुरझर कंटेनरच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. सिंदखेड राजा इथून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथुन येत असतांना ही घटना घडली.
नाशिक जिल्हयातील इगतपुरीहून देवदर्शनाहुन परतत असतानाच औरंगाबाद जालना रोडवरील करमाड नजीक गाढेजळगाव शिवारात पहाटे अडीच च्या सुमारास उभ्या टेलर (एम एच ४० बी जे ८१११) कुरुझर (एम एच २८ ए एन ३६२०) धडकली या भीषण आपघातात बुलढाणा जिल्ह्यातील ४ जनांचा जागीच ठार झाले असुन त्यामध्ये जेष्ठ पत्रकार काशिनाथ मेहेत्रे (वय ६५) सिंदखेडराजा, रवि जाधव (वय ३२), रूषींदर तिडके (वय ५५) रा.गोंदेगाव जि. जालना, नर्स संगिता जाधव (वय ३६) तांदूळवाडी, याचा मुत्यु झाला आहे. त्यांच्या निधनामुळे शहरासह परिसरावर शोककळा पसरली आहे. काशिनाथ मेहेत्रे यांनी गेल्या २५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये होते. त्यामध्ये दैनिक देशौन्नतीमधे तर सद्या लोकमत मध्ये काम करीत होते. तसेच शेतकरी संघटनेमधे शरद जोशी यांच्या सोबत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठावला. माळी सोयरिक संकेत स्थळ च्या माध्यमातून शेकडो युवक युवती विवाह जुळवले त्यांच्या अचानक आपघाताच्या दुर्घटत मुत्यु झाल्यामुळे शरासह परिसरात शोककळा पसरली आहे.



No comments:
Post a Comment