Friday, January 31, 2020

स्व.राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती निमित्त काँग्रेस सेवादल तर्फे पदयात्रेचे आयोजन.


देऊळगावराजा : प्रतिनिधी
       अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे वतीने स्व.राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात चार विभागात ७५ किलोमीटर पदयात्रेचे नियोजन करण्यात आले असून दि.३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान औरंगाबाद ते सिंदखेडराजा पदयात्रा निघून समारोप होणार आहे या समारोपीय कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस सेवादलाचे जिल्हा सरचिटणीस टोनू अनिल सावजी यांनी केले आहे.
         काँग्रेस सेवादलाचे वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे की स्व.राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील चार विभागात ७५ किलोमीटर ची पदयात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे दि.३० जानेवारी रोजी औरंगाबाद येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पासून सुरू झालेल्या पदयात्रेचा समारोप सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्म भूमी मातृतीर्थ नगरीत दि.२ फेब्रुवारी रोजी होणार आहे,या चार दिवसीय पदयात्रेत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी ७५ वृक्षांचे वृक्षारोपण,स्वातंत्र्य सेनानी यांचा सन्मान, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना ५ हजार रुपये आर्थिक मदत, शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान, रक्तदान शिबिर, ७५ अपंग विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप, ७५ आदर्श शिक्षकांचा सन्मान, ७५ क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेल्या व्यक्तींचा सन्मान, ७५ UPSC-MPSC - दहावी, बारावी मध्ये मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान, ७५ पत्रकारितेचा पुरस्कार प्राप्त पत्रकाराचा सन्मान, ७५ गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप,इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन टोनू अनिल सावजी यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment