Sunday, January 19, 2020

राज्यस्तरीय द रीयल पँथर राजकीय रत्न पुरस्काराने भाई दिलीप खरात सन्मानित


ब्लू टायगर सामाजिक संस्थाच्या वतीने पुणे येथे द रीयल पँथर पुरस्कार सोहळा आयोजीत
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
       सिंदखेड राजा मतदार संघातील रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष तथा गोल्डन मॅन भाई दिलीप खरात यांना ब्लू टायगर सामाजिक संस्थाच्या वतीने पुणे येथे मान्यवारांच्या हस्ते द रीयल पँथर राजकीय रत्न पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले.
     दि.१९ जानेवारी रोजी पुणे येथील कै. हिराबाई मारोतीराव धनकुडे महिला बहुद्देशीय सभागृहात ब्लू टायगर सामाजिक संस्थाच्या वतीने द रीयल पँथर पुरस्कार सोहळाचे आयोजण करण्यात आले होते. कार्यमाच्या अध्यक्ष स्थानी बाळासाहेब भांडे तर उदघाट म्हणून आनंदराज आंबेडकर हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आनंद शिंदे, गौतम दादा ब्रह्मरक्षे, विलास रुपवते, साकीभाऊ गायकवाड,  कडूबाई खरात, विलास भाई डोळसे, भाई दिलीप खरात, बाबासाहेब साळवे, अशोक निकाळजे आदी उपस्थित होते तर या प्रसंगी डॉ. विनायक जोशी, बाबुराव चांदेरे, मयूर भांडे, अमोल बालवडकर, ज्योतीताई कळमकर, रूपालीताई सायकर, सम्राट राजे गायकवाड, रुपेश सरवदे, संतोष रोकडे, जीवन आंधारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या भूमिती व कार्यक्रमात मातृतीर्थ मतदार संघातील रिपब्लिकन सेना चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा गोल्डन मॅन भाई दिलीप खरात यांना भीम गीताचे गायिका कडूबाई खरात व एक निळा एक भगवा फेम अशोक निकाळजेकार्यक्रमाचे प्रस्ताविक  यांच्या हस्तेराज्यस्तरीय द रीयल पँथर राजकीय रत्न पुरस्काराने भाई दिलीप खरात सन्मानित करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ब्लू टायगर सामाजिक संस्थे चे संस्थापक अध्यक्ष बाळराजे शेळके यांनी उपस्थितां समोर  संस्थेची तथा या पुरस्कार सोहळ्याला बद्दल संपूर्ण माहिती दिली.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्लू टायगर समाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी शहरातील तसेच पुणे परिसरातील गणमान्य अतिथी  उपस्थित होते. भाई दिलीप खरात यांचा संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
   

No comments:

Post a Comment