Sunday, January 19, 2020

सामाजिक समीकरणे जुळवत विकास घडवू : ना.डॉ.शिंगणे


  न.प.गटनेत्या सौ.सुनिता सवडे आणि राष्ट्रवादी युवानेते गणेश सवडे यांच्या हस्ते सत्कार
 देऊळगावराजा :  अशरफ पटेल   
          राज्यातील राजकीय समीकरणांप्रमाणे सामाजिक समीकरणे जुळवत बुलडाणा जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ना.डॉ. राजेंद्र शिंगणे, सौ.रजनी शिंगणे, लक्ष्मी शिंगणे, पुष्पक भैया यांचा नागरी सत्कार न.प.गटनेत्या सौ.सुनिता सवडे आणि राष्ट्रवादी युवानेते गणेश सवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
  

        येथील जुनी नगर परिषदेच्या इमारतीत दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना.डॉ.शिंगणे बोलत होते. शहरामध्ये आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आगमन झाले. त्यानंतर स्थानिक विश्रामगृहा पासून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुक न.प.संकुला समोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून श्री बालाजी महाराजांचे दर्शन त्यांनी घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतीलाल दादा सिंगलकर हे होते तर विचारपिठावर डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पत्नी रजनी शिंगणे मुलगी लक्ष्मी शिंगणे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना ना.डॉ.शिंगणे म्हणाले की,  जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी राज्यशासनाने जाहीर केलेला ३११ कोटी रुपयांचा निधी केलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार जन्मस्थळ विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही अभिवचन दिले. इतरांना विरोधी पक्षांमध्ये बसण्याची भाषा करणाºया भाजपा पक्षालाच विरोधी बाकावर बसण्याची वेळ आज रोजी आलेली आहे. तसेच मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करू नये. तर मोदी यांची तुलना हिटलरशी व्हावी, याप्रसंगी नागरी सत्कार मध्ये सर्व प्रथम राष्ट्रवादी पक्षाचे नगर पालिका गट नेत्या सौ.सुनिता सवडे व राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते गणेश सवडे, माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, माजी नगराध्यक्षा सौ.मालतीताई कायंदे, जिल्हा परिषद सद्सय मनोज कायंदे, सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे, खरेदी विक्री संघाचे वा.द.वानखेडे, माजी ताुलकाध्यक्ष बि.एम.पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दिलीपकुमार झोटे, काँग्रेस पक्षाचे न.प.गटनेते मो.रफीक, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष रविंद्र गिते, सदस्य पाराजी खांडेभराड, बद्री शिंदे, जि.संघटक भरत दंदाले, सामाजिक कार्यकर्ते शंकर शिंगणे, माजी तंट्टामुक्ती अध्यक्ष सुभाष शिंगणे, जिल्हा शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष रमेश दंदाले यांच्या हस्ते करण्यात आले.   





 


















No comments:

Post a Comment