Thursday, January 16, 2020

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी


न.प.प्राथमिक शाळा क्र. २ मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन
   देऊळगाव राजा : प्रतिनधी  
        स्थानिक  नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र २  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
               दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त न.प.प्राथमिक शाळा क्र.२ च्या विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन राजमाता जिजाऊ आणि महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनचरित्रावर भाषणाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. तसेच शाळेतील काही मुले व मुली यांनी राजमाता जिजाऊ व बालराजे शिवछत्रपती यांच्या भूमिकेत वेशभूषा साकार करून आपली उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक के.एम.नायकडा सर व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतीलच शिक्षक टी.बी. डिघोळे सर यांनी स्थान स्विकारले. उपस्थित सर्व शिक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्याकडून राजमाता जिजाऊ व महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात  डिघोळे सर, खेडेकर सर,  मघाडे सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. यावेळी मघाडे सर, बर्डे  गरे सर, राठोड  सर, खेडेकर सर यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे बहारदार  यशस्वी सूत्रसंचालन  यु.आर.नागरे सर यांनी केले.

1 comment: