Sunday, February 2, 2020

चांगल्या कामाची दखल घेण्याची गरज : मा.प्रकाश पोहरे


सुषमा राऊत संजीवणी दर्पण पुरस्काराने सन्मानित
संजिवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
डोणगाव : विशेष प्रतिनधी
     वृत्तपत्रांत नियमितपणे लेखन करणाऱ्या, तसेच बातम्या देणाऱ्या लेखकांना पत्रकार हे शहरात आणि आपल्या परिसरात शोध पत्रकारीता करित असत. पत्रकारांना समाज जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. या छोट्या गावात संजिवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने पत्रकारांना सन्मान देण्यात येते ही कौतुकाची बाब आहे असे प्रतिपादान दैनिक देशोन्नतीचे सर्वेसर्वा मा.प्रकाश पोहरे यांनी केले.
    

      संजिवनी युवक कल्याण, शैक्षणिक क्रीडा प्रसारक मंडळच्या वतीने डोणगाव येथे दि.२ फेब्रुवारी रोजी राजूरकर मंगल कार्यलय मध्ये पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अद्यक्ष स्थानी रमेश काका सावजी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून देशोन्नती चे सर्वेसर्वा मा. प्रकाश पोहरे यांची उपस्थिती होती. तर सत्कारमूर्ती म्हणून डॉ.शाम गाभने, रियाज खान पठाण, राजेंद्र पळसकर, निंबाजी पांडव, डॉ. गणेश गायकवाड, सौ.उषाताई खोडके, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  दीपक पवार ठाणेदार, नाझीम कुरेशी, मधुकर घिरके, प्रमोद देशमुख, गजानन चनेवार, मो.यासीन यांच्या उपस्थितत झालेला आहे. स्व. डॉ. जगदीश बिडवई स्मृति प्रीत्यर्थ संजीवनी दर्पण पुरस्कार २०२० पुरस्कारा साठी संतोष थोरहाते सकाळ, सय्यद जाबीर जानेफळ टाइम्स, सुषमा राऊत दिव्य मराठी, देविदास खनपटे, स्व. माधवराव उल्हामाले स्मृति प्रीत्यर्थ असामान्य व्यक्तीचा सत्कार हाजी अनवर खान पठाण, विलासमामा पळसकर, सुनील बोराळकर, सागर कडभणे, गणेश महाराज पांडव, वसीम खान हे उपस्थित होते. पुढे बोलताना मा. पोहरे साहेब म्हणाले की, वृत्त पत्रात काम करणे खूप कठीण झाले आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून समाजाला न्याय देण्याचे काम करतो असे निर्भय निपक्ष पत्रकारांची दखल घेण्याची गरज आहे. स्थानिक सामाजिक संस्था संजीवनी सेवाभावी परिवार वतीने देण्यात दर वर्षी प्रत्येक क्षेत्रात उलखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. या प्रसंगी ग्रामीण जिल्हा पत्रकार संघ अद्यक्ष, तालुका अद्यक्ष प्रमोद देशमुख, गजानन चनेवार यांनी पत्रकारांची आजची परिस्तिथी वर प्रकाश टाकला. म्हणूच १४ वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करीत अन्याय व अत्याचाराविरुद्ध लिखाण करुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा छोटासा प्रयत्न करणाऱ्या माँ जिजाऊ जिल्ह्यातील महिला दिव्य मराठीचे निर्भिड निपक्ष पत्रकार सुषमा राऊत  यांच्या कार्याची दखल घेत  सेवाभावी परिवाराने आपल्या संस्थेकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या संजिवणी दर्पण पुरस्काराने दि.२ फेब्रुवारी रोजी राजूरकर मंगल कार्यलय डोणगाव येथे देशोन्नती वूत्तपत्राचे सर्वेसर्वा मा. प्रकाश पोहरे तथा मान्यवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
    
       याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना सुषमा राऊत म्हणाल्या की पत्रकारितेच्या क्षेत्रातुन  निवड करून मला जो सन्मान दिला माझ्या या कार्याची कुठेतरी दखल घेण्यात येऊन मला हा पुरस्कार  दिल्याबद्दल संजीवनी सेवाभावी परिवार  यांचे मी आभारी आहे. निश्चितच माझ्या लेखणीला बळ मिळणार आहे तर पुरस्कारांच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होतो असे कार्यक्रमा मुळे पत्रकांराची दाखल घेतली पाहिजे त्यांच्या लेखणीला न्याय मिळाला पाहिजे.या वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.    कार्यकमाचे प्रास्ताविक, सूत्र संचालन, आभार, शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी बहुसंख्येत उपस्थित होते विशेष उपस्थीत मध्ये मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



No comments:

Post a Comment