●आ. श्वेताताईंनी प्रचार केलेले दोन्ही उमेदवार आपटले !
● ऍड. जयश्रीताईंच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त
बुलडाणा : रणजीतसिंग राजपूत
भाजपच्या देशभरातील १०० पेक्षा अधिक नेत्यांनी दिल्लीत प्रचाराचे पाव रोवले होते. भाजपशासित ११ राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीच्या रस्त्यांवर चपला झिजवित होते.. ४० स्टार्स भाजपने उतरविले होते. ४५०० कॉर्नर बैठका भाजपने घेतल्या आणि मोदी-शाह यांच्या जोडगोळीने जंग जंग पछाडले... परंतु केजरीवाल यांचा तोड काही निघू शकला नाही आणि ‘आप’च्या झाडूने भाजपचे दिल्ली काबिज करण्याचे स्वप्न झाडून काढले.. कॉंग्रेसचा तर भोपळाही फोडू शकली नाही.. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची भाषणे कामात आली नाहीत...माजी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील भाजपच्या शिर्ष नेत्यांचे पॉम्प्लेट वाटण्याला दिल्लीकरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या.. फडणवीसांचे बेंबीच्या देठापासून दिलेल्या भाषणाला दिल्लीकरांनी ‘आरडा-ओरड’ ठरविले आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या प्रचाराचा दस्तरखुद्द केजरीवालांनीच ट्विटरवर ‘विनोद’ करीत धुव्वा उडविला.. तिथे चिखली येथील तेजतर्रार-तडफदार आमदार श्वेताताई महाले यांना दोष देवून काय होणार ! इतरांनी काय दिवे लावले ? हे आधी बघावे म्हणा, मग श्वेताताईंकडे बोट दाखवा ! आणि हो, बोट दाखवितांनाही एक लक्षात ठेवा, चार बोटे आपल्याकडे असतात बरं..!!!_

ताईंकडे जरा चांगले मतदारसंघ सोपवायचे असते ना ! देवून देवून काय दिले तर मॉडेल टाऊन आणि सदर बाजार. अहो, मॉडेल टाऊनचे उमेदवार माहीतीये कोण होते.. शाहीन बागवाल्यांना ‘आतंकवादी’ म्हणणारे, ५०० रुपये घेवून आंदोलन सुरु आहे असे विवादीत विधान करणारे कपील मिश्रा ! श्वेताताईंना अशा उमेदवाराचा प्रचार करावा लागला.
अर्थात यापूर्वी आम आदमी पार्टीत असणारे कपिल मिश्रा यांना भाजपात नुकतचे प्रवेशित झाले होते. केजरीवालप्रिय जनतेने केजरीवालांचा द्वेष करणार्या कपिल मिश्रांना नाकारले त्यात ताईंचा काय दोष ! मॉडेल टाऊनमधून आपचे अखिलेशपति त्रिपाठी यांना ५२६६५ मते मिळालीत. त्यांनी केवळ १० हजारांच्या फरकाने ४१५३२ मतांनी कपिल मिश्रांचा पराभव केला. दहा हजार मते कुणाला कमी वाटतील परंतु श्वेताताईंना त्याचे महत्व माहित आहे. कारण त्या सुद्धा केवळ ५ हजार मतांनी निवडून आलेल्या आहेत. दूसरा मतदार संघ सदर बाजार, तो ही तसाच.. कंटाळवाणा ! भाजपकडून जयप्रकाश (ताई यांना भाई म्हणून संबोधतात) उभे होते. आपचे वरिष्ठ नेते सोम दत्त यांनी जयप्रकाश भाईंना धूळ चारली. थोडे फार नाही, तर तब्बल २५ हजार मतांनी जयप्रकाशभाई पडले. पण ताईंनी दोन्ही ठिकाणी प्रामाणिकपणे प्रचार केला होता. दिल्लीतील त्यांच्या धडाकेबाज प्रचाराच्या बातम्या बुलडाणा जिल्ह्यातील वृत्तपत्रांमध्ये सारख्याच झळकल्या होत्या. आमदार नसतांनाही त्यांनी चिखली मतदारसंघासाठी करोडो रुपयांचा निधी खेचून आणला होता. आताही जनसामान्यांच्या प्रश्नासाठी त्या सातत्याने रस्त्यावर उतरून असतात.. ताईंचे संघटन कौशल्य आणि जनसंपर्काबाबत भाजपचे राष्ट्रीय नेतेही जाणून आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे त्या पक्षात सर्वपरिचीत आहेत. त्यांच्यातील या वैशिष्ट्यांची दखल घेतच पक्षाने त्यांना दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी विशेषत्वाने पाठविले. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर, ३१ जानेवारीला त्यांनी दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता. दिल्ली मधील गीता नगर राम मंदिर , जुनी गुप्ता कॉलनी, लक्ष्मी नारायण मंदिर या ठिकाणी सरस्वती पूजन करून जोरदार प्रचार केला.. शेवटी आले जनतेच्या मना, तिथे कुणाचे चालेना ! दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार पडले. या पडण्याला ताई जबाबदार मुळीच नाहीत. पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडणे, हीच खरे पक्षकर्तव्य असते. शेवट उमेदवाराचे कर्तृत्व, त्याची लोकप्रियता, त्याचा पूर्वइतिहास तसेच त्याला जनता किती प्रतिसाद हे सुद्धा निवडणूकीत पाहिले जाते. फक्त एक प्रश्न तेव्हढा उपस्थित होतो की, जर कपिल मिश्रा आणि जयप्रकाश भाई निवडून आले असते तर श्वेताताईंना विजयाचे श्रेय मिळाले असते की नाही..? याचे उत्तर हो असेल तर त्यांच्या पराभवाची जबाबदारीही या उत्तरात दडली आहे. बोलो भारत माता की जयऽऽऽ वंदे मात्रम !!
■ जयश्रीताईंनी केला होता ‘मॉडेल टाऊन’मध्ये प्रचार ■
कॉंग्रेसचा तर पार सुपडा साफ झालाय.. ७० जागांपैकी कॉंग्रेसला एकही जागा मिळू शकलेली नाही. बुलडाणा जिल्ह्यातील महिला पदाधिकर्यांमध्ये वक्तृत्व आणि नेतृत्वाबाबत ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, त्या ऍड. जयश्रीताई शेळके यांना कॉंग्रेसने दिल्लीतील ‘मॉडेल टाऊन’मध्ये प्रचारासाठी बोलाविले होते. योगायोग म्हणजे त्याच मतदारसंघात आ. श्वेताताई भाजप उमदेवारासाठी प्रचार करीत होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्री एकमेकांच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करीत होत्या. पक्षीय दृष्ट्या आणि जिल्हा परिषदेतही एकमेकांच्या विरोधक असणार्या या दोन नेत्यांचे केवळ मैदान बदलले होते...दिल्लीतील मैदानात त्या जणू एकमेकांना आव्हान देऊन होत्या. राज्याच्या महिला प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षा चारूलता टोकस यांच्या मार्गदर्शनात जयश्रीताईंनी कॉंग्रेस उमेदवार आकांक्षा ओला यांचा जोरदार प्रचार केला. आजच्या निकालपत्रात आकांक्षा ओला यांना केवळ ४ हजार मते मिळाली आहेत. कॉंग्रेसला दिल्लीकरांनी आधीच बेदखल केलेले होते. परंतु एव्हढे झाडून साफ करतील असे वाटले नव्हते. त्यासाठी जयश्रीताईंना जबाबदार धरता येणार नाही. पण निवडून आले असते तर श्रेय नक्कीच देता आले असते. हो ना !
संपादक
अशरफ पटेल
सप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस
देऊळगाव राजा
संपादक
अशरफ पटेल
सप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस
देऊळगाव राजा

No comments:
Post a Comment