Friday, February 7, 2020

पत्रकार संतोष देशमुख यांना राजरत्न पुरस्कार जाहीर


छत्तीसगढच्या राजपाल अनुसईया उईके, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांच्या उपस्थिती १४ फेब्रुवारी रोजी होणार गौरव
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
  श्रीमंत राजे रघुजी भोंसले (प्रथम) बहुउद्देशिय
स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या व्यक्तींची राजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. त्यानुसार यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार संतोष देशमुख यांना श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) स्मरणार्थ राजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गतवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०१६, चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार आणि २०१६ मध्ये कै.बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
       गत १५ वर्षांपासून संतोष देशमुख पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. कृषी, सहकार, परिवहन, जिल्हा परिषद, बाजारपेठ, वन, वन्यजीव, पर्यावरण, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, वीज, पाणी, रियल इस्टेट आदी क्षेत्रात  शोध पत्रकारिता, सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. शेती विषयावर पुरस्तक लिखाण देखील केले आहे. याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासना कृषी व फलोत्पादन विभाग, अप्रतिम मिडिया, आविष्कार फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन् गौरव केला आहे. तर श्रीमंत राजे रघुजी भोंसले (प्रथम) प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीने संतोष यांची अतिशय मानाच्या राजरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामुळे
त्यांचे सर्वस्तरावरून कौतुक व अभिनंद होत आहे.

No comments:

Post a Comment